प्रभागातील किरकोळ फेरबदलांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभागातील किरकोळ फेरबदलांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर
प्रभागातील किरकोळ फेरबदलांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर

प्रभागातील किरकोळ फेरबदलांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ४६ पैकी केवळ आठ प्रभाग रचनेत किरकोळ फेरबदल झाल्यामुळे ही रचना राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या पथ्यावर पडली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात हरकती, सूचना करुनही भारतीय जनता पार्टीला म्हणावे तसे यश न मिळाल्याचे चित्र आहे.

राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक हरकती व सूचनांमध्ये महापालिकेचा वरचा क्रमांक होता. तब्बल ६ हजार ४०० हरकती, सूचना प्राप्त आल्या. त्यापैकी ५ हजार ६८४ वर सुनावणी झाली होती. तीन सदस्यीय प्रभाग रचना आमच्याच फायद्याची असल्याचा दावा सत्ताधारी भाजपा व विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला होता. परंतु भाजपने हरकती, सूचना घेण्यात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली होती. राज्य सरकारने प्रभाग रचनेचा अधिकार स्वतःकडे घेतल्यानंतर दोनचा प्रभाग होईल, अशी भाजपची अटकळ होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तीन सदस्यीस प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर तो अंदाजही फोल ठरला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ही रचना राष्ट्रवादीला फायद्याची असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
--
-प्रभाग सात सर्वाधिक लोकसंख्येचा;
अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता. १३) प्रसिद्ध केली आहे. २, ३, ५, ७, ११,१२,२६, २७ या आठ प्रभागात काही बदल झाले आहेत. पाच हजारापर्यंत लोकसंख्येत वाढ, घट झाली आहे. शेवटचा प्रभाग सांगवी असेल. १३९ नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे ४५ तर चार सदस्यांचा एक प्रभाग असेल. तो सांगवीचा असेल. त्याची लोकसंख्या ४६ हजार ९७९ आहे. तर, तीन सदस्यांच्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक ७ सँण्डविक कॉलनी, रामनगर याची सर्वाधिक ४२ हजार २५१ लोकसंख्या आहे. हा प्रभाग सर्वात मोठा आहे. तर, सर्वांत कमी प्रभाग क्रमांक २ - चिखली वठाण, मोरेवस्ती, कुदळवाडीची ३२ हजार १६१ लोकसंख्या आहे.
--
-अनुसूचित जाती-जमाती साठी २५ जागा राखीव
तीन सदस्यीय प्रभागाची किमान लोकसंख्या ३२ हजार, तर कमाल लोकसंख्या ४२ हजार आहे. लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी २२ तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ असेल. अनुसूचित जातींसाठी कोणते प्रभाग आरक्षीत होतात, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. तर, अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग आरक्षित राहणार आहेत.
--
नगरसेवक संख्येत वाढ
नगरसेवक संख्या ११ ने वाढून ती १३९ झाली. या अंतिम प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता होती. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला असेल, कोणता भाग वगळला असेल याबाबत कमालीची उत्सुकता होती. राजकीय क्षेत्रासह सर्वत्रच अंतिम आराखड्याचीच चर्चा होती.

दृष्टीक्षेपात प्रभाग लोकसंख्या व आरक्षण
- लोकसंख्या (२०११) - १७ लाख २७ हजार ६९२
-अनुसूचित जातीची लोकसंख्या - २ लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के)
-अनुसूचित जातीसाठी आरक्षण १६ टक्के - एकूण २२ जागा (पैकी ११ महिला, ११ पुरुष)
- अनुसूचित जमातीची लोकसंख्या - ३६ हजार ५३५ (२.११ टक्के)
- अनुसूचित जमातीसाठी आरक्षण ३ टक्के - ३ जागा (पैकी २ महिला)
- सर्वसाधारण प्रभाग - ११४ (पैकी ५७ महिला)
- एकूण नगरसेवक संख्या - १३९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63557 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top