
संभाजी महाराज जयंतीनिमित्त
अवती भवती
आकुर्डीत रक्तदान शिबिर
पिंपरी, ता.१५ ः अखिल आकुर्डी गाव श्रीरामनवमी उत्सव समिती यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त हनुमान मंदिरासमोर सकाळी रक्तदान शिबिर घेतले. त्यामध्ये परिसरातील युवा कार्यकर्ते १०२ रक्तदाते यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी पिंपरी सिरॉलॉजिकल ब्लड बँक यांच्या सहकार्य लाभले. शिबिरासाठी परिसरातील सर्व गणेश मंडळ व आकुर्डी परिसरातील सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
सुटी जाहीर करण्याची मागणी
पिंपरी, ता.१५ ः संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजीमहाराज जयंती प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज जयंतीला शासकीय सुटी जाहीर करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. तेजस गवई, सदाशिव लोभे, राजेश सातपुते, जगदीश दुधभाते, राम क्षीरसागर, राहुल पवार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजीनगरमध्ये आदरांजली
पिंपरी, ता. १५ ः मराठा सेवा संघ व त्यांच्या विविध कक्षाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली. संभाजी महाराज यांच्या संभाजीनगर येथील पुतळ्यास मराठा सेवा संघाचे वतीने पुष्पहार अर्पण केला. मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, आरोग्य कक्षाचे डॉ. मोहन पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे, कायदा व न्याय कक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम डफळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई, संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष गोविंद खामकर, मराठा सेवा संघाचे महासचिव सचिन दाभाडे, उपाध्यक्ष प्रकाश बाबर व अशोक सातपुते उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63559 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..