शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ८० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या
आमिषाने ८० लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ८० लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ८० लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने मिळून सहा जणांची एकूण ८० लाखांची फसवणूक केली. हा प्रकार निगडीतील प्राधिकरण येथे घडला.
याप्रकरणी अमोल चिंतामण संखे (रा. सेक्टर क्रमांक २, वाशी, नवी मुंबई) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय हिरेमठ (रा. सेक्टर क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी , सध्या, रा. मु. पो. बंडगाळ माळ , इचलकरंजी, कोल्हापूर) व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंग या भागीदारी व्यवसायाचा चांगला अनुभव असल्याचे सांगितले. त्यांच्या इपिटोम इन्व्हेस्टमेंट स्टॉक फर्म शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास जादा परतावा दिला जाईल, असे आमिष दाखवले. फिर्यादी, त्यांची आई, वडील व तीन मित्रांना या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सहा जणांनी एक कोटी ४२ लाख ३ हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर विनय व त्याच्या पत्नीने फिर्यादी व त्यांच्या सहकारी भागीदारांना ६१ लाख ७५ हजार रुपये परत दिले. मात्र, उर्वरित ८० लाख २८ हजार रुपये परत न देता या रकमेचा अपहार करून फसवणूक केली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63577 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top