
‘भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त गृह संकुलास मुलभूत सुविधा द्या’
पिंपरी, ता. १५ : पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. या शहरामध्ये विविध ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांकडून मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून गृहप्रकल्प रहिवाशांना हस्तांतरित केले आहेत. अशा गृह संकुलामध्ये महापालिकेने मूलभूत नागरी सुविधा द्याव्यात, अशी मागणी माजी नगरसेविका माया बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या गृहप्रकल्पामधील रहिवासी कर भरत असून या करापासून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढले आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून गृहप्रकल्प रहिवाशांना हस्तांतरित केले आहेत. अशा गृह प्रकल्पांमध्ये महापालिकेमार्फत पाणी पुरवठा, विद्युत, ड्रेनेज, आरोग्यविषयक अशा मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63596 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..