
व्याजापोटी २२ लाख न दिल्यास कुटूंबाला मारण्याची धमकी
पिंपरी - व्याजापोटी (Interest) तरूणाला (Youth) २२ लाख रूपये मागितले. पैसे न दिल्यास कुटुंबाला खलास करण्याची धमकी (Warning) दिली. दमदाटी करीत जबरदस्तीने जागेच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
बाळकृष्ण अंबादास पवार (रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन तानाजी निंबाळकर (रा. चिंचवडगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. शहाजी हनुमंत कवितके, हनुमंत कवितके (दोघेही रा. मोरे वस्ती, चिखली), शहाजी कवितकेचा अज्ञात साथीदार, विजय वसंतराव ढुमे (रा. चिंचवडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादीचा जुन्या मोटारींचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी शहाजी, हनुमंत व एक अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडे व्याजापोटी २२ लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही. तुला व तुझ्या कुटुंबाला खलास करू, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्या कार्यालयातून ओढून बाहेर नेत मोटारीतून डांगे चौक येथे नेले. आंबेठाण येथील सात गुंठे जागेचे दस्त तयार करून त्यावर जबरदस्तीने फिर्यादी यांना सही करण्यास भाग पाडले. विजय ढुमे व सचिन निंबाळकर यांची मोटार ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फिर्यादी यांनी सर्व रक्कम देऊन त्यांच्या नावावर डिलिव्हरी नोट तयार केली होती. शहाजीने ढुमे व निंबाळकर यांना आर्थिक आमिष दाखवले. ढुमे व निंबाळकर यांना कोणतेही कायदेशीर हक्क नसताना फिर्यादी यांच्या परस्पर तेच गाड्यांचे मूळ मालक असल्याचे भासवून त्यांच्या संमतीने आरटीओ कार्यालयाची दिशाभूल केली.
खोटी कागदपत्रे सादर करून दोन गाड्या शहाजी यांच्या नावावर ट्रान्सफर करून फिर्यादी यांची फसवणूक केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63613 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..