प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये साडेआठ टन कचरा संकलित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये 
साडेआठ टन कचरा संकलित
प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये साडेआठ टन कचरा संकलित

प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये साडेआठ टन कचरा संकलित

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि आपला परिवार सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने एच. ए. मैदान येथे प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत सुमारे साडेआठ टन (८.५) कचरा संकलित करण्यात आला.
देशात स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले असून, पिंपरी-चिंचवड शहराने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने स्वच्छाग्रह हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्लॉगेथान रविवारी (ता.१५) मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
प्लॉगेथॉन मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजीनवाल, शांताराम माने, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, लक्ष्मण साळवे, आपला परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुदाम शिंदे, उपाध्यक्ष अनिल शर्मा, सचिव अजित भालेराव, कार्याध्यक्ष किरण कांबळे, सहसचिव दत्तात्रेय बोराडे, जनसंपर्क अधिकारी उद्धव वांजळे यांच्यासह २५० स्वयंसेवक, महापालिकेचे ७० कर्मचारी, बीव्हीजी ग्रुपचे कर्मचारी, डिव्हाईन संस्थेचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. मोहिमेसाठी तीन वाहने व एक ट्रक यांचा वापर केला.
या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी शहरातील विविध गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, कंपन्या यांच्यामध्ये स्वच्छ स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, कंपन्यांना स्टार मानांकन देण्यात आले आहे. त्याच बरोबर अशा संस्थांना सामान्य करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. ओला सुका कचरा विलगीकरण करणे, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे अशा निकषाच्या आधारावर हे मानांकन देण्यात येत आहे.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून ८ टन कचरा संकलित
महापालिका ‘फॅ’ क्षेत्रीय कार्यालय आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने स्पाईन रस्त्यावर कुदळवाडी चौक ते कचरा संकलन केंद्रापर्यंत प्लॉगेथॉन मोहीम राबविण्यात आली. त्यात २९७ स्वंयसेवक तसेच महापालिका कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण आठ टन कचरा संकलित करण्यात आला. मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सीताराम बहुरे, सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी आणि सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63709 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top