
ऐन लग्नावेळी वऱ्हाडी गैरहजर; पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १५ : रितीरिवाजाप्रमाणे लग्न ठरले, साखरपुडा झाला, मुलीच्या कुटुंबीयांनी ठरल्याप्रमाणे सर्व पूर्तता केली. त्यानंतरही वेगवेगळ्या मागण्याकरीत नियोजित वर व त्याचे कुटुंबीय ऐनवेळी लग्नास हजर राहिले नाहीत. हा प्रकार पिंपरी व पिंपळे गुरव येथे घडला.
याप्रकरणी नियोजित वधूने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय प्रदीप कोतवडेकर (वय २८), प्रदीप पांडुरंग कोतवडेकर (वय ६२), आदित्य प्रदीप कोतवडेकर (वय २७), वंदना प्रदीप कोतवडेकर (वय ५६, सर्व रा. इंद्रायणी इरा सोसायटी, गायकवाड वस्ती, मोशी) व मध्यस्थ किरण सुतार (वय ५२, रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी रितीरिवाजाप्रमाणे पाहण्यासाठी येऊन फिर्यादीला लग्नासाठी पसंत केले. फिर्यादींसोबत साखरपुडा केला. लग्नाची यादी ठरवून फिर्यादी पक्षाने यादीत ठरल्याप्रमाणे सर्व पूर्तता केली. तरीही आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या मागण्या करून लग्नास हजर राहिले नाही. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक करून अब्रुनुकसान केली. हा प्रकार ३ मार्च ते १४ मे या कालावधीत पिंपरी व पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे घडला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63832 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..