यमुनानगरमध्ये मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यमुनानगरमध्ये मंदिराच्या 
सभामंडपाचे भूमिपूजन
यमुनानगरमध्ये मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

यमुनानगरमध्ये मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : निगडीतील यमुनानगरमधील श्री विश्वकर्मा (मंदिर) सेवाभावी ट्रस्ट येथील मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते झाले. नगरसेवक कमल घोलप, सुमन पवळे, प्रा. उत्तम केंदळे, सचिन चिखले, सुलभा उबाळे, शशीकिरण गवळी, सुरेश म्हेत्रे, डिगा माधवन, सचिन सानप आदी उपस्थित होते. विद्यानंद मानकर व उद्योजक पांडुरंग सुतार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड, खेड, आंबेगाव, मुळशी व मावळातील समाज बांधव, किसन महाराज चौधरी, ज्ञानेश्वर सुतार, दत्तात्रय सुतार, रमेश सुतार, समीर भालेकर, विवेकानंद सुतार, दगडूजी काळे, गणपतराव बारवकर, बाळासाहेब टकले, दीपक भिलारे, आप्पा भालेराव, विजय भालेराव, सुरेश गणोरकर, मधुकर भालेकर, सुधाकर भालेकर, अनिल भालेकर, शरद इनामदार, गजानन ढमाले, सुभाष सराफ, नारायण पाटील, तुकाराम वारंग, अकुंश जगदाळे उपस्थित होते. ट्रस्टच्या विश्वस्तांचा परिचय संस्थापक अध्यक्ष भगवानजी श्राद्धे यांनी करून दिला. संस्था कार्य अहवालाचे वाचन श्राद्धे व संजीव सुतार यांनी केले. रमेश सुतार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63843 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top