पिंपरीत सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा
पिंपरीत सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा

पिंपरीत सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा २०२२-२३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, पिंपरी या ठिकाणी २१ जुलैपासून सुरु झालेल्या आहेत.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले गटामध्ये प्रथम फेरीमध्ये एसएनबीपी शाळेविरुद्ध निगडी सिटी प्राइड : १ गोल अर्जुनसिंह, पिंपळे गुरव प्रा. शाळा विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल : ४ गोल महंमद अर्षद, पलविंदर सिंग, विवेश पाटील, मोहमद मॅथ्यू तसेच, ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे विरुद्ध सिटी इंटरनॅशनलचे अभिनव मनोज याने एक गोल, न्यू पुणे पब्लिक स्कूल निगडीविरुद्ध एल्प्रोचे अर्जून मोरे, अर्जुन सुर्वे, इशान वर्पे यांनी प्रत्येकी एक गोल, दुसऱ्या फेरीत एसएनबीपी विरुद्ध सिटी प्राइडचे अर्जूनसिंह मिल, व बडस इंटरनॅशनल, चिखली विरुद्ध विद्यानिकेतनच्या पारस मेरुरकरने दोन व अद्वैत पवारने एक गोल, तसेच द होली मिशन स्कूल नवी सांगवी विरुद्ध रॉयल वर्ल्ड स्कूलने एक गोल, अभिषेक विद्यालय चिंचवड विरुद्ध इन्फंट जिजस्, वाकडच्या अर्णव झोडगे व धवल देशपांडेने एक-एक गोल केला आहे.

१७ वर्षाखाली मुले गटामध्ये वयोगटामध्ये निगडी न्यू पुणे पब्लिक स्कूलविरुद्ध एल्प्रो इंटनॅशनलचे रोनित सिंगने एक गोल, विसडम देहूरोड विरुद्ध प्रियदर्शनी मोशीचे आर्यन देशपांडे व रुद्र निंबाळकरने एक गोल, तसेच ऑर्किड इंटरनॅशनल विरुद्ध एसएनबीपी मोरवाडीचे हर्ष भगवान, अर्जून हेगडे, रुद्रांश मिश्रा यांनी प्रत्येकी एक गोल करुन विजय मिळविला आहे.

क्रीडा पर्यवेक्षक ए. के. महाकाळ यांनी सर्व काम पाहिले. क्रीडा शिक्षक अशोक शिंदे, भाऊसाहेब खैरे यांनी सहकार्य केले. पंचप्रमुख रवी पिल्ले यांनी स्पर्धेचे काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82395 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top