‘आरटीई’च्या ५७८ जागा रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरटीई’च्या ५७८ जागा रिक्त
‘आरटीई’च्या ५७८ जागा रिक्त

‘आरटीई’च्या ५७८ जागा रिक्त

sakal_logo
By

पिंपरी, ता.२३ ः शहरात शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर २ हजार ६७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. तर ५७८ जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून वारंवार विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही अर्ज करण्यासाठी विद्यार्थी पुढे न आल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली. सोडत काढल्यानंतर सहा एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यासाठी प्रथम २० एप्रिलपर्यंत मुदत होती. त्यानंतर ती ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. तरीही प्रवेश पूर्ण न झाल्याने १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

खासगी शाळांमधीळ ३ हजार २५५ जागांसाठी ५ हजार ५८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. २१८ विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी प्रवेश नाकारण्यात आले. त्यापैकी निवड यादीतील २ हजार २३ जणांचे प्रवेश निश्‍चित झाले. नंतर, प्रतीक्षा यादीतील ७५४ जणांनाही प्रवेश मिळाला. यादीतील इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तीन फेऱ्या झाल्या. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ तारखेपर्यंत मुदतवाढ होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82483 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..