महापालिकेला ‘सीएसआर’ फंड ठरला तारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला ‘सीएसआर’ फंड ठरला तारक
महापालिकेला ‘सीएसआर’ फंड ठरला तारक

महापालिकेला ‘सीएसआर’ फंड ठरला तारक

sakal_logo
By

पिंपरी, ता.२३ ः कोरोना कालावधीत महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी शहरातील नामांकित कंपन्यांना ‘सीएसआर’ फंडातून मदत द्यावी, अशी हाक दिली होती. याला प्रतिसाद देत कंपन्यांनी विविध वैद्यकीय साहित्य देत मदत केली. परिणामी, महापालिकेला ‘सीएसआर’ फंड तारक ठरल्याचे सुखद चित्र पाहायला मिळत आहे.

शहरात नामांकित कंपन्यांसह सुमारे साडेतीन हजार लघुउद्योग आहेत. कंपन्यांना व्यावसाईक सामाजिक जबाबदारी निधीतून (सीएसआर फंड) दोन टक्के रक्कम खर्च करावी लागते. शहर आणि परिसरात अनेक नामांकित कंपन्या आहेत. यातील अॅमक्युअर फार्मासिटिकल्स, टाटा ऑटो कॉम्प, टेट्रा पॅक, सिप्ला फाउंडेशन, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, फोब्स मार्शल, सिस्को इंडिया अँड एसए, एआरसी, वेस्ट झोन इंडिया (उबेर), सँडविक वॉटर इंडिया टूल प्रायव्हेट लिमिटेड, अल्फा लावल लिमिटेड, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, फिनोलेक्स, दिवी तुर्क ट्रान्स्फर, थरमॅक्स फाउंडेशन, जानकीदेवी बजाज, सेंचुरीका लिमिटेड, एम्फेनॉल, ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंटॉन इंडिया फाउंडेशन, कॅपजेमिनी टेक्निकल सर्व्हिसेस, अॅटलास कॉपको, गरवारे टेक्निकल लिमिटेड, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूज, एचडीएफसीबैंक, अमेझॉन इंडिया, एसकेएफ इंडिया लिमिटेड, इन्फोसिस हिंजवडी, क्रेडाई, पुणे मेट्रो, वॉक्सवेगन, बँक ऑफ महाराष्ट्र कॉग्निझेंट, पर्सिस्टंट लिमिटेड, युनायटेड वे मुंबई, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांमार्फत वस्तू स्वरूपात मदत प्राप्त झाली.

आकडे बोलतात
कोरोना साहित्य - संख्या
-मास्क - ३ लाख ९४ हजार ३००
-पीपीइ कीट - ३३ हजार 713
-फेस शील्ड - १० हजार
-कोविड केअर सेंटरसाठी बेड्स - २ हजार
-मेडीकल हॅन्ड गोल्व्हज् - १२ हजार १४८
-व्हेंटीलेटर्स - १५६
-सिरीज पंप -५५
-नेब्युलायझर - ५८
-व्हील चेअर्स - ४५

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82500 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..