भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सद्भावना दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सद्भावना दौड
भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सद्भावना दौड

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सद्भावना दौड

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त पोलिस आयुक्तालय व ७५ ग्रामरक्षक दल सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २३ जुलै रोजी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने सद्भभावना दौडचे आयोजन केले होते.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना दौड झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ चपाले, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, विभागीय अध्यक्ष सतीश देशमुख, संघटक लक्ष्मण इंगवले, राजेंद्र येळवंडे उपस्थित होते.
एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीपासून भोसरी विभागात स्पाईन रस्त्याने साधारण तीन किमी अंतराची दौड झाली. भारत माता की जय जयघोषात लाल रंगाचे टी शर्ट परिधान केलेले ग्राम रक्षक सदस्य सहभागी झाले. महिला पोलिस हवालदार दीपमाला लोहकरे, पोलिस अंमलदार विशाल काळे, महिला पोलिस अंमलदार संगीता सरसे, अर्चना जाधव, मिनाक्षी वासनिक, अर्चना चौधरी, मालती फलके, ग्राम रक्षक दलाचे सदस्य राजाराम सावंत, संजय कांबळे, सुनील वाघ, सुरेश गावडे, बळिराम शिरसाठ, संजय महाजन, नितीन बाकळे, उद्धव कुंभार, प्रकाश पानस्कर, संजय लोखंडे, सुनील चौगुले, सतीश देशमुख, दादा इंगवले, राजेंद्र येळवंडे या सदस्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक शिवाजी आवारे यांनी केले. आभार लक्ष्मण इंगवले यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82666 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..