निगडीतून निघणाऱ्या ‘ट्रॅव्हल्स’च्या मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीतून निघणाऱ्या  
‘ट्रॅव्हल्स’च्या मार्गात बदल
निगडीतून निघणाऱ्या ‘ट्रॅव्हल्स’च्या मार्गात बदल

निगडीतून निघणाऱ्या ‘ट्रॅव्हल्स’च्या मार्गात बदल

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : हिंजवडी आयटी पार्कसह भोसरी, चाकण, तळेगाव औद्योगिक क्षेत्रामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्याही शहरातून जात असल्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी निगडीतून निघणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस मार्गात बदल केल्याचा आदेश वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी काढला आहे.
महापालिका क्षेत्रात लोकसंख्ये बरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. खासगी ट्रॅव्हल्स बस या निगडीतील भक्ती-शक्ती ठिकाणांहून खंडोबामाळ चौक मार्गे एसकेएफ समोरून कामिनी हॉटेल, अहिंसा चौक, रिव्हरव्हयू मार्गे, बिर्ला हॉस्पिटल, थेरगाव, तापकीर चौक मार्गे जातात. परंतु, या भागात सध्या मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्यामुळे या भागात खासगी प्रवाशी वाहनांना बंदी घातली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त भोईटे, सहायक आयुक्त सतीश माने यांनी विविध खासगी बस कंपन्यांचे मालक व व्यवस्थापकांच्या बैठकी घेतल्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केला आहे.

असा आहे बदल
खासगी ट्रॅव्हल्स बस निगडी भक्ती-शक्ती, काचघर येथून भेळ चौक, संभाजी चौक, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रिव्हर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, रक्षक चौक, औंध मार्गे जाणार आहेत. सायंकाळी पाच ते रात्री १० वाजेपर्यंत खंडोबा माळ, महावीर चौक, मोरे सभागृह, चाफेकर चौक, थेरगाव, काळेवाडी मार्गावर प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे, ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांना ऑफिसपासून ते थांब्यापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करावयाची आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82740 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top