स्काय चाइल्ड फाउंडेशनच्या विशेष मुलांना गणवेश भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्काय चाइल्ड फाउंडेशनच्या 
विशेष मुलांना गणवेश भेट
स्काय चाइल्ड फाउंडेशनच्या विशेष मुलांना गणवेश भेट

स्काय चाइल्ड फाउंडेशनच्या विशेष मुलांना गणवेश भेट

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः जन्मजात मतिमंद, गतिमंद, स्वमग्न विशेष मुलांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या स्काय चाइल्ड फाउंडेशन संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त २१ मुलांना गणवेश भेट देण्यात आले.
प्राधिकरणातील सावरकर उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला माजी नगरसेविका शर्मिला बाबर प्रमुख पाहुण्या होत्या. माजी उपमहापौर शैलजा मोरे अध्यक्षस्थानी होत्या. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सोनाली पालांडे, उपाध्यक्षा सीमा गोरे, अंजली पालांडे आदी उपस्थित होते. विशेष मुलांनी गणेशवंदना सादर केली. पालांडे म्हणाल्या, ‘‘माझी स्वतःची मुलगी शंभर टक्के दिव्यांग असल्याचे लक्षात आल्यावर अशा मुलांना एकाच छताखाली आधार देऊन त्यांच्यावर उपचार व पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी फाउंडेशनची स्थापना केली. यामागे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नसल्याने पालकांनी सहकार्य केले. मार्गदर्शक विशाखा कदम यांनी, ‘मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्याशी वागावे,’ असे आवाहन केले. वाचा तज्ज्ञ नयना सक्सेना यांनी, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अशा मुलांना शिकवावे लागते, असे सांगितले. पालक विशाल राहेगावकर व नरेंद्र मंगेराव यांनी मनोगत व्यक्त केले. वैजयंती गोखले यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व पालांडे यांनी आभार मानले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82762 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..