विविध योजनांची माहिती कक्ष करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध योजनांची माहिती 
कक्ष करण्याची मागणी
विविध योजनांची माहिती कक्ष करण्याची मागणी

विविध योजनांची माहिती कक्ष करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘जयंती प्रबोधनपर्व’ होणार आहे. त्यासाठी समाज विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती कक्ष करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे १ ते ५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पाच दिवस जयंती प्रबोधनपर्व मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते. या पाच दिवसांच्या कालावधीत शहरातील हजारो नागरिक या जयंती प्रबोधनपर्वात सहभागी होतात. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या मार्फत अनेक विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. परंतु, या योजनांचा प्रसार प्रचार नागरिकांपर्यंत न झाल्याने अनेक नागरिक, विद्यार्थी, महिला यापासून वंचित राहतात. तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज विकास विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजना मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, महिला यांच्यापर्यंत पोहचवण्याकरिता जयंतीच्या यादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथील स्मारकाजवळ योजनांची माहिती देणारा कक्ष, तसेच योजनांचे पत्रक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे. निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83188 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..