तळेगावातील वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावातील वाहतूक कोंडीने 
स्थानिक नागरिक हैराण
तळेगावातील वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक हैराण

तळेगावातील वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक हैराण

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २६ ः जिजामाता चौक ते सुभाष चौक दरम्यान असलेल्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. रविवारचा आठवडे बाजार असो किंवा अन्य वार असोत सर्व दिवशी येथे जीवघेणी वाहतूक कोंडी होते. आधीच रस्ता अरुंद असून, चार-पाच भीजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून, पाल ठोकून कोंडीत भर घातली आहे. त्यांच्यावर नगरपरिषदेने कारवाई करून भाजी दुकाने रस्त्यापासून मागे हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सुभाष चौक परिसरात रविवारी आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. या रस्त्यावरच भाजी विक्रेते बसत असल्याने त्यावेळीतर कोंडी उच्चांक गाठत असते. नागरिकांना पायी चालणेही धोक्याचे झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा खासगी दवाखाने, किराणा दुकाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, शवगृह, मेडीकल दुकाने व अन्य दुकाने असल्याने येथे वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. येथील वाहतूक कोंडी तसेच या जीवघेण्या समस्यांबाबत नगरपरिषदेने उपाययोजना त्वरित करावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

फोटो ८०२५२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83330 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top