राखी बाजारपेठ सजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राखी बाजारपेठ सजली
राखी बाजारपेठ सजली

राखी बाजारपेठ सजली

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ : बहिण लहान असो की मोठी तिच्या हातून राखी बांधण्याचा अभिमान म्हणजे रक्षाबंधन. ११ ऑगस्टला हा सण येतोय. कोरोनामुळे दोन वर्षांनी आता बहुसंख्य घरांमध्ये परगावी असलेल्या बहिण-भावांची भेट होणार आहे. त्यामुळे लाल धागा, गोंड्यापासूनच्या नानाविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. लहानग्या भावांसाठी थ्रीडी, संगीत व प्रकाशमयी अशा राख्याही आल्या आहेत.

राखीच्या घाऊक विक्रेत्या सीमा कुंकूलोळ (चिंचवडगाव) म्हणतात, ‘‘यावर्षी विदेशात राखी पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरु झाली आहे. शिवाय, सीमेवरच्या जवानांचाही कोणाला विसर पडलेला नाही. विविध संघटनांकडून त्यांचे पॅकेजिंग करण्यात गुंतल्या आहेत. यंदा बाजारपेठेत चांगले वातावरण आहे. किरकोळ विक्रेत्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. आनंदाचे वातावरण आहे. सर्वच वस्तू महागल्याने राखीवरही परिणाम झाला आहे. मात्र, मुळात तिची किंमतच कमी असते की झालेली वाढ नगण्य आहे.’’

थ्रीडी राख्यांमध्ये छत्रपती शिवाजी, राजमुद्रा असे प्रकार आहेत. कुंदन व जरीचा धागा याला मागणी येईल. चांदी व चंदनाच्या महागड्या राख्यांना श्रीमंत वर्गात पसंती असते. धागे, रंगसंगती, नक्षीकाम व विणकाम पाहूनही निवड युवती, महिला करतात, असे बाजारात फेरफटका मारल्यावर दिसले. सर्वसाधारणपणे राख्यांची किंमत वीस ते २०० रुपये आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83485 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..