
शहरातील प्रश्नाबाबत आता महापालिकेचे ट्विटर अकाऊंट
पिंपरी, ता. २६ ः विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देताना त्यात नागरी सहभागही असावा यासाठी महापालिका विविध संवाद माध्यमांचा वापर करीत आहे. आता जलदगतीने माहितीचा प्रसार व्हावा व नागरी संवाद साधण्यासाठी ई-मेलसह ट्विटरचा वापरही विविध विभागांद्वारे केला जाणार आहे. नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाशी संवाद साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना ट्विटर वापराविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. त्या वेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘महापालिकेच्या योजना, सुविधा, उपक्रम आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटरसारखे माध्यम वापरात आणले पाहिजे. आयुक्त म्हणून माझे स्वत:चे ट्विटर अकाऊंट आहे. महापालिकेने नागरिकांसाठी व्हॉटस् अॅप-चॅट बॉट प्रणालीचा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे दैनंदिन १०० पेक्षा अधिक व्यक्ती संवाद साधून आपल्या सूचना, तक्रारी मांडत आहेत. यामुळे प्रशासन गतिमान होण्यास मदत होत आहे. आता सर्व विभागांचे स्वतंत्र ट्विटर अकाऊंट असेल. त्याद्वारे ट्विट करून नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. त्यांना त्वरीत सेवा मिळू शकेल. नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.’’
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83601 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..