
एटीएममध्ये पैसे भरणा करणाऱ्या कामगारांकडून साडेतीन लाखांचा अपहार
एटीएममध्ये पैसे भरणा करणाऱ्या
कामगारांकडून साडेतीन लाखांचा अपहार
पिंपरी, ता. २७ : एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या दोन कामगारांनी मशिनमध्ये भरण्यासाठी दिलेल्या ८१ लाखांपैकी साडेतीन लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार भोसरीतील पांजरपोळ येथे एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घडला. अशोक गजानन पोतदार (वय ३९, रा. समर्थनगर, दिघी), भगवान अशोक थोरात (वय २२, रा. आदिनाथ नगर, लांडेवाडी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे. याप्रकरणी संतोष भगवान उदावंत (वय ४३, रा. हिंगणे खुर्द, ता. हवेली) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सेक्युलर व्हॅल्यू लिमिटेड कंपनीत असिस्टंट मॅनेजर असून ते ऑडिटचे काम करतात. कंपनीच्या व्यवहारांचे ऑडिट करताना ९ जून ते २० जुलै या कालावधीत आरोपींकडे ८१ लाख रुपये पांजरपोळ येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये भरण्यासाठी दिले होते.
त्यातील साडेतीन लाख रुपये आरोपींनी एटीएममध्ये न भरता त्या रकमेचा अपहार केला. त्यानंतर ते पैसे एटीएम मध्ये भरले असल्याचा रिपोर्ट तयार करून तो कंपनीला देऊन कंपनीची फसवणूक केली. आरोपी हे एटीएम मशिन एक्झिकेटीव्ह ऑफिसर म्हणून काम करतात. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83900 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..