अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

अवतीभवती

भीमाशंकर धार्मिक यात्रा
पिंपरी ः चिंचवड येथील श्री अग्रसेन महाराज ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणातर्फे श्रावणमास निमित्ताने भीमाशंकर धार्मिक यात्रा काढण्यात आली. या यात्रेत आगरवाल समाजातील ४०० भाविक सहभागी झाले होते. यावेळी अग्रसेन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल, सचिव सत्पाल मित्तल, खजिनदार अशोक बंसल, माजी अध्यक्ष विनोद बंसल, माजी अध्यक्ष जगदीशप्रसाद सिंघल , सुभाष बंसल, प्रेमचंद मित्तल, सांस्कृतिक समिती अध्यक्ष गौरव आगरवाल सुनील अगरवाल, संदीप गुप्ता, सागर अगरवाल, धर्मेंद्र आगरवाल, सीए के. एल. बंसल, जोगिंदर मित्तल,विनोद मित्तल, राजीव ओमप्रकाश अगरवाल आदी उपस्थित होते.

गजानन महाराज ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी ः निगडी येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका शर्मिला बाबर, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वैशाली तळेगावकर, डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीचे डॉ. पंकज कुमार, डॉ. माधव भुस्कुटे, गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, माजी अध्यक्ष माणिक जाधव, देविदास हरमकर, उपाध्यक्ष भाऊराव खडसे, उपाध्यक्ष रवी मिर्जी, सहसचिव सुरेश गुळवे, सचिन राडे आदी उपस्थित होते. यावेळी दहावीमध्ये ८० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त अशा १७० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष रामभाऊ पिसे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊराव खडसे यांनी तर आभार माणिक जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास ठाकरे, विशाल पिसे, अभय तारक, रसिक पिसे, सहदेव जानोरकर, हर्षद चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.


नेत्र चिकित्सा शिबिर
पिंपरी ः चिखली- घरकुल येथे कै.तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलिस मित्र, पर्यावरण मित्र, आरोग्य मित्र या उपक्रमांतर्गत स्वर्गीय तुकाराम शिवराम तनपुरे यांच्या स्मरणार्थ घरकुल येथे नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. एकूण ११८ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. हडपसरच्या पी.बी.एम.ए.चे एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्य लाभले. शिबिराचे संयोजन विजयकुमार अबड, प्रताप सोनवणे, वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, संतोष शिंदे, शैलेश रोकडे, बाळकृष्ण भोकरे, कुमार अक्षय, कुमार दिपेश, कांतिलाल वानखेडे, कुणाल बडीगेर यांनी केले. या शिबिरास मुझफ्फर इनामदार, प्रकाश हागवणे, वहाब शेख, स्मिता तांदळे,चेतन चव्हाण, चांद मुलाणी उपस्थित होते.

अवैध धंदे बंद करण्याची मागणी
पिंपरी ः निगडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर २२ मधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत कृती समितीने निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ मुंडे यांच्याकडे केली आहे. त्यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. कृती समितीचे कार्यकर्ते रामदास ताटे, हौसराव शिंदे, मुकुंद रणदिवे, बाळासाहेब बरगले, अरुण रणदिवे, भीमा गवळी, हनुमंत गवळी, विजय कांबळे, राजू गायकवाड, झोपडपट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेलचे शहर अध्यक्ष संतोष निसर्ग, सतीश पवार, हात गाडी टपरी बांधकाम मजूर संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, विजय साळवी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84099 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..