अप्पर तहसील कार्यालय शोधू कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्पर तहसील कार्यालय शोधू कुठे?
अप्पर तहसील कार्यालय शोधू कुठे?

अप्पर तहसील कार्यालय शोधू कुठे?

sakal_logo
By

पिंपरी, ता.२८ ः इयत्ता अकरावी, पदवीधर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना आकुर्डी - प्राधिकरणातील अप्पर तहसीलदार कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. नव्या स्थलांतरीत जागेची माहिती दर्शनी भागावर लावलेल्या फलकावर नसल्याने दररोज शेकडो विद्यार्थ्यांसह पालकांचा गोंधळ उडत आहे. स्थलांतरित नव्या जागेचा शोध घ्यायचा की विविध दाखल्यांसाठी धावपळ करायची, अशी संभ्रमावस्था पालकांची झाली आहे.

प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीएम’मध्ये विलीनीकरण केल्याने औंध ‘पीएमआरडीएम’चे कार्यालय आकुर्डीत स्थलांतरीत झाले. त्यानंतर उपनिबंधक आणि तहसील कार्यालय हलविण्यात यावे, असा प्रस्‍ताव शासनाकडे पाठविला. त्यानुसार निगडीतील लोकमान्य चौकातील महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या (प्राधिकरणाची जुनी प्रशासकीय इमारत) इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे. यात अभिलेख कक्षासह नागरी सुविधा केंद्रही हलविण्यात येत आहे. त्यामुळे ‘पुढील आदेशापर्यंत कार्यालयीन कामकाज बंद राहील, याची नोंद घ्यावी.’ असा माहितीचा फलक प्रवेशद्वारावर लावलेला आहे. मात्र, नेमके कोठे स्‍थलांतर करण्यात येत आहे, याचीच माहिती नाही.

सध्या अकरावीसह विविध प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांची धावपळ सुरू आहे. काहींना जातीचे दाखले तर उत्पन्नाचे दाखले मिळविण्यासाठी सर्वजण खेटे मारत आहेत. सध्या तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्रातील दस्तऐवजांचे जमा करण्याचे काम सुरू आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी विचार करायला हवा होता
शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आधीच पालक, विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाढतात. मानसिक ताण आलेला असतो. त्यातच अचानक प्राधिकरण कार्यालयाने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याने आमचा पुरता गोंधळ उडाला आहे. प्रवेश प्रक्रियेच्या काळात तरी स्थलांतराचा निर्णय घेण्यापूर्वी आणि तसा अध्यादेश काढण्यापूर्वी मुख्याध्याकाऱ्यांनी विचार करायला हवा होता, असा मुद्दा काही पालकांनी ‘सकाळ’कडे व्‍यक्त केला.

कोट
‘‘मला सरकारी नोकरीसाठी जातीचा दाखला हवा आहे. त्यासाठी अर्ज घेऊन आलो आहे. तसेच लहान भवाला अकरावीसाठी उत्पन्नाचा दाखला पाहीजे. पण आता आमची त्रेधा उडाली आहे. अचानक का निर्णय का घेतला? शिवाय माहितीचा फलक नाही. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
-अक्षय वैराक, पदवीधर विद्यार्थी काळेवाडी

कोट
‘‘पीएमआरडीएच्या प्रस्तावानुसार कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यासाठी कार्यालयीन कामकाज बंद ठेवावे लागणार आहे. मात्र, शहरात ९५ महा-ई-सेवा केंद्रे आहेत. त्यामुळे कोणाची गैरसोय होणार नाही. नागरीकांना सर्व प्रकारचे दाखले ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. ’’
-गीता गायकवाड, तहसिलदार अप्पर तहसीलदार कार्यालय आकुर्डी

फोटो ः ८०६७१, ६७२, ६७३, ६७४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84262 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top