
ऑगस्टमध्ये आरटीओचे वडगाव, लोणावळ्यात दौरे
पिंपरी, ता. २९ : पक्का परवाना मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ऑगस्ट २०२२ मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी दोन आणि तीन ऑगस्ट रोजी खेड, १० आणि १२ ऑगस्ट रोजी मंचर, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी जुन्नर, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी वडगाव मावळ आणि २९ ऑगस्ट रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी एक ऑगस्ट २०२२ रोजी सायं. पाच वाजता कोटा उपलब्ध उपलब्ध होणार आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने पूर्वी (अपॉईंटमेंट) घेतलेल्या वेळेतच हजर राहावे, तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84290 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..