
बाल संरक्षण कक्ष सदस्यांची रामनगर प्रकल्पाला सदिच्छा भेट
पिंपरी, ता.२९ ः चिंचवडमधील रामनगर येथे वस्ती पातळीवर बाल संरक्षण यंत्रणा मजबूत व्हावी आणि गरजू कुटुंबांचे सबलीकरण व्हावे, या दृष्टीने दीपक फाउंडेशन ‘पायलट’ प्रकल्प राबवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बाल संरक्षण कक्ष सदस्यांनी या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.
प्रकल्पा दरम्यान वस्ती पातळीवरील स्वयंसेवक, बाल पंचायत आणि वॉर्ड बाल संरक्षण समिती (WCPC) गठण केली आहे. बाल संरक्षण आणि बाल हक्कांसाठी त्यांचे काम सुरू आहे. ते प्रत्यक्षरीत्या पाहून, समजून घेऊन आपापल्या जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारची यंत्रणा उभी करण्यासाठी महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधील जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU) सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांची २७ जणांची टीम काम करते.
निगडीतील अण्णाभाऊ साठे चौकात सर्वांची बैठक झाली. यामध्ये कामाचे सादरीकरण केले. एकत्रित सहकार्याने गाव- वस्ती पातळीवर बाल संरक्षण यंत्रणा कशा प्रकारे मजबूत करता येईल याबाबत चर्चा झाली आणि बाल संरक्षणाच्या दृष्टीने रामनगर वस्तीमध्ये होत असलेल्या कामाचे सर्व बाल संरक्षण कक्ष सदस्यांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी रामनगर वस्तीमधील वॉर्ड बाल संरक्षण समितीचे सदस्य, सर्व स्वयंसेवक, बालपंचायत सदस्य, मिरॅकल फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84465 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..