पिंपरी चिंचवड महापालिका विभागात केवळ १८६ शाळाबाह्य मुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school students
महापालिका शिक्षण विभागाचे सर्वेक्षण फार्स!

पिंपरी चिंचवड महापालिका विभागात केवळ १८६ शाळाबाह्य मुले

पिंपरी - महापालिका शिक्षण विभागाकडून शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आउट अंतर्गत शहरात सर्वेक्षण झाले. पंधरा दिवसाच्या या शोध मोहिमेत केवळ १८६ मुले जण आढळले आहेत. मोहीम राबवण्याचा फार्स केल्याचे दिसून येते. या मोहिमेत ९२ मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले.

२०१५-१६ साली झालेल्या सर्वेक्षणात १३५ मुले सापडली होती. कोरोना संसर्ग काळात सहा ते १८ वयोगटातील अनेक बालके शालाबाह्य झाली आहेत. अशा मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केलेल्या महापालिका शिक्षण विभागाकडून हे अभियान राबविण्यात आले. ही मोहीम ५ ते २० जुलै या कालावधीत भोसरी, डुडुळगाव, मोशी, रावेत, वाकड, काळा-खडक, पुनावळे आदी भागात राबविण्यात आली. यासाठी शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी करून घेतले. शाळास्तरावर मुख्याध्यापकांकडून समिती स्थापन केली.

असे झाले सर्वेक्षण

शहर हद्दीतून स्थलांतरित झालेल्या मुलांची आकडेवारी संकलित करणे, अन्य शहरातून शहरात आलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. वस्त्या, इमारतींचे बांधकाम, वीटभट्ट्या, शहरातील विविध चौक, बसथांबे आदी ठिकाणी शालाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला.

वयोगट ६ ते १८ वयोगटातील मुलांचा सर्वे करण्यात आला. यामध्ये कधीच शाळेत न गेलेले व अनियमित उपस्थितीमुळे शालाबाह्य झालेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरी भागात कधीच शाळेत न गेलेली १५५ बालके तर शाळेत नावे आहेत. परंतु शाळेत न गेलेली ३१ मुले आढळली आहेत.

शहरात १८६ शालाबाह्य मुलांचा शोध घेण्यात महापालिका शिक्षण विभागाला यश आले आहे. त्यांना शाळेत दाखल करून घेतले आहे. शहरातील विविध भागात शालाबाह्य मुलांचा शोध शिक्षकांनी घेतला आहे.

- अनिता जोशी, पर्यवेक्षिका महापालिका शिक्षण विभाग

खरोखरच सर्वेक्षण झाले?

महापालिकेतील जन्ममृत्यू नोंदीचा वापर करावा. कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्यांचा शोध घेणे अपेक्षित होते. तसेच ही मोहीम वाडी वस्ती, गाव, वॉर्ड या स्तरावर घरोघरी जाऊन सर्वे होणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले दिसून आलेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84667 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..