
शहरातील खड्डे
शहरातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था
पहिल्याच पावसाने शहरात झालेली रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड पडलेले खड्डे हे कंत्राटदारांचे निकृष्ट काम आणि त्याला पाठीशी घालणारे प्रशासन हेच कारणीभूत आहे. खड्डे पालिकेने आपल्या खर्चाने भरण्यापेक्षा कंत्राटदाराकडून पूर्णपणे हे काम पुन्हा करून घ्यावे. त्यांना काळ्या यादीमध्ये टाकावे. स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या या शहराला ही दुरवस्था लाजिरवाणी आहे. खड्डे रस्ते आणि नालेसफाई या प्रश्नावर काहीतरी धोरणात्मक तोडगा कायमस्वरूपी काढावा. दरवर्षी येणाऱ्या या दुखण्याचा सोक्षमोक्ष लावावा.
-गिरिधर केदारी, जगताप डेअरी वाकड
निकृष्ट दर्जाची कामे
आदित्य बिर्ला हॉस्पिटलचा समोर खूप जास्त खड्डे पडले आहेत. दरवर्षी तिथे पावसाळ्यात खड्डे पडतात. पण निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. महापालिकेने याविषयी प्रश्न मार्गी लावावा.
- प्रदीप कानडी, थेरगाव
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84855 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..