यिन - अमिताभ गुप्ता, अभिनेते सौरभ गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन - अमिताभ गुप्ता, अभिनेते सौरभ गोखले
यिन - अमिताभ गुप्ता, अभिनेते सौरभ गोखले

यिन - अमिताभ गुप्ता, अभिनेते सौरभ गोखले

sakal_logo
By

यिन - अमिताभ गुप्ता, अभिनेते सौरभ गोखले


पिंपरी, ता. ३१ ः ‘‘नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. त्यासाठी आजच्या तरूणपिढीने समाजाला पुढे नेण्यासाठी नेतृत्वगुण जोपासले पाहिजेत,’’ असा सल्ला पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘यिन’च्या तरुणांना दिला.


आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या सभागृहात ‘यिन’ केंद्रीय कॅबिनेट समिती निवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अभिनेते सौरभ गोखले, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संचालक गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले, ‘‘आजच्या घडीला प्रत्येकजण एकमेकावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करताहेत, ही मानसिकता प्रथम समाजाने बदलली पाहिजे. समाज विकासासाठी नेतृत्वगुण महत्त्वाचा आहे. म्हणूनच एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते. तुमचे विचार, तुमची वागण्याची पद्धत हे तुमचे नेतृत्व कोण करत यावर ठरते, आणि त्यामुळेच आयुष्यात प्रत्येकाला योग्य नेतृत्वाची गरज असते. युवकांनी इतरांना मदत करण्याचा गुण जोपासला पाहिजे. अनेकदा नैराश्यातून जात असताना युवकांनी ‘बॅकअप प्लॅन’ ठेवू नये. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी तरूणांनी सक्षमपणे उभे राहणे आवश्‍यक होते.’’


इन्फोबॉक्स
राजकारणी सहजपणे दैनंदिन जीवनात भूमिका साकारतात - अभिनेते सौरभ गोखले
‘यिन’च्या तरुणांशी प्रश्‍नोत्‍तरांच्या माध्यमातून संवाद साधला. गोखले म्हणाले, ‘‘कुठल्याही क्षेत्रात नैराश्‍य येऊ शकते. यापासून मनोरंजनसृष्टीदेखील मुकलेली नाही. मी स्वतः या फेजमधून गेलो आहे. ‘राधा ही बावरी’ सारख्या यशस्वी मालिकेनंतरही माझ्याकडे दीडवर्ष कोणतेही काम नव्हते. यास्थितीत कोणीही खचून जाऊ शकतो. अशावेळी मला माझ्या आवडीनिवडी मदतीला आल्या. अनेकदा चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते, त्यापासून सावध राहणे आवश्‍यक आहे.
समाजसेवा ठरवून करता येत नाही. मनाला पटेल,अशा गोष्टीतून समाजसेवा करा. जाणीवपूर्वक समाजसेवा करता येत नाही, त्यासाठी अंर्तमनाची हाक ऐकली पाहिजे. राजकारणी नेते हेच खरे अभिनेते. अगदी सहजपणे ते दैनंदिन जीवनात भूमिका साकारत असतात. ते दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा अशी भूमिका चोखंदळपणे पार पाडत असतात.’’

कोट
‘‘तरूणांच्या कौशल्य आणि नेतृत्व गुणांना वाव देण्याचे काम ‘यिन’ करत आहेत. सामाजिक आणि सांस्‍कृतिक मूल्ये जोपासली जात आहेत. भविष्यात ‘यिन’च्या वाटचालीस खुप शुभेच्‍छा.’’
-डॉ. गिरीश देसाई, संचालक पिंपरी चिंचवड ट्रस्ट


‘‘‘सकाळ यिन’च्या माध्यमातून भविष्यात नेतृत्व गुण तयार होत आहेत. विद्यार्थीदशेतील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी उत्तम व्यासपीठ तयार आहे. त्याचा उपयोग महाविद्यालयीन युवकांना होत आहे. ’’
-डॉ. गोविंद कुलकर्णी, संचालक पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय

‘‘मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढविण्याचे काम ‘यिन’च्या माध्यमातून होत आहे. सर्वांना संघटित करून सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाला संघटित नेतृत्व म्हणावं लागेल. हल्लीच्या काळात असे नेतृत्व
‘यिन’मुळे पाहायला मिळत आहे. ’’
-डॉ. महेंद्र सोनवणे, प्राचार्य एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालय


81461
81462
81463
81465
८१४७१

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85315 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top