यिनच्या केंद्रिय कॅबिनेट समिती जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनच्या केंद्रिय कॅबिनेट समिती जल्लोष
यिनच्या केंद्रिय कॅबिनेट समिती जल्लोष

यिनच्या केंद्रिय कॅबिनेट समिती जल्लोष

sakal_logo
By

केंद्रीय कॅबिनेट समितीचा जल्लोष

समितीच्या सभापती जळगावची दिव्या भोसले, तर उपसभापती पिंपरीचा हेमंत राजेस्थ यांची निवड


पिंपरी, ता.३१ ः सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होताच तरुणाईने जल्लोष केला. मुख्य समितीच्या सभापतीपदी जळगावची दिव्या भोसले तर उपसभापतिपदी पिंपरीचे हेमंत राजेस्थ यांची निवड करण्यात आली. निकाल जाहीर होताच शिट्ट्या वाजवत तरुणाईने आनंदोत्सव साजरा केला.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या सभागृहात ‘यिन’ केंद्रीय कॅबिनेट समिती निवड कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात या पदासाठी दहा विषयांच्या समितीच्या अध्यक्षांमधून मुख्य सभापती व उपसभापतींची निवड करण्‍यात आली. त्यासाठी ऑनलाइन मतदान झाले. प्रत्येक सदस्यांनी ईर्षेने मतदान केले. त्यामुळे माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे तरुणाईचे लक्ष लागले होते. निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असल्याने उमेदवारांच्या मनातही धाकधूक होती. कोणाला किती मते पडतील, याचा अंदाज बांधला असला तरी निकालाची उत्सुकता ताणली गेली होती. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणूक पार पडली. ‘यिन’च्या ॲपवर निकाल घोषित होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी विजयी उमेदवारांच्या नावाच्या घोषणा दिल्या. दरम्यान, ‘यिन’व्यासपीठांतर्गत ऑनलाइन परीक्षा, गटचर्चा आणि अहवालातून समितीच्या पदाधिकारी निवड प्रक्रिया केली आहे.


निवडणूक अधिकारी म्हणून ‘यशदा’चे बबन जोगदंड यांनी काम पाहिले. त्यांनी निकाल जाहीर करून उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. पुढे ते म्हणाले, ‘‘निकाल लावणे कठीण बाब असते. अनेकवेळा निवड करताना कस लागतो. पण त्यातूनही उत्तम आणि सर्वोत्तमची निवड केली जाते. लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्चा आणि अहवाल सादरीकरणातून ही निवड केली आहे. ‘यिन’च्या व्यासपीठातून तरुणांना घडवीत आहेत. त्यामुळे केंद्रीय कॅबिनेट समितीच्या सभापतींची निवड करण्याची जबाबदारी महत्त्वाची होती. ’’


उर्वरित समिती अध्यक्ष मुख्य समितीचे पदाधिकारी असतील. कार्यकारिणी पुढील प्रमाणे
रोहीत पाटील (शेती), नीलेश चव्हाणके (रोजगार), सुदर्शन सरनाईक (उद्योजक), उमेश चव्हाण (आरोग्य), परमेश्‍वर इंगोले (राजकीय), नेहा मेश्राम (कौशल्य विकास), अनिकेत बनसोडे (क्रीडा), प्रतीक्षा पाटील (स्त्री प्रतिष्ठा ).


‘यिन’सारखी संस्‍था असून नेतृत्व घडवत आहे - ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. मुलांना शुभेच्छा देत पुढे ते म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला कारभार करण्याचा अधिकार दिलेला आहे. युवकांना घडविण्यासाठी ‘सकाळ’ने ‘यिन’सारखी संस्‍था निर्माण केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. योगदान महत्त्वाचे आहे. जगाला आणि भारत देशाला तरुणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यिनच्या केंद्रीय कॅबिनेट समितीच्या काम करवून घेतले पाहिजे. त्यांनी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. ’’


विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
‘सकाळ यिन’ने जी सामाजिक जबाबदारीची पताका माझ्या खांद्यावर दिली. ती मी निष्ठेने मिरवेल. आपण सोबत राहू, आपण सोबत काम करू’ अशी शपथ ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

फोटो
८१४७३
८१४६४
८१४६६
८१४७७
८१४७८
८१४७५
८१४७६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85356 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..