गुरुवंदन सभेत रंगले तबलावादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुवंदन सभेत रंगले तबलावादन
गुरुवंदन सभेत रंगले तबलावादन

गुरुवंदन सभेत रंगले तबलावादन

sakal_logo
By

पिंपरी, ता.१ ः चिंचवडमधील श्रीधरनगर येथे समर्थ तबला वर्गातर्फे गुरुवंदना संगीत सभा झाली. मधू जोशी व तबलावादक विष्णू कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभिक ते प्रवेशिका पूर्ण विद्यार्थ्यांचे तबलावादन झाले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नंतर मध्यमा प्रथम ते विशारद पूर्ण विद्यार्थ्यांचे तबलावादन सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी त्रिताल, झपताल, एकताल या तालात विविध लयीमधे ‘पेशकार, कायदे, रेले, गती, तुकडे, चक्रधार’ विविध प्रकार सादर केले. वृषाली भणगे यांनी एकल तबलावादन ताल त्रितालात वेगवेगळ्या उस्तादांच्या पारंपारिक रचना सादर केल्या. यावेळी हार्मोनिअम लेहरा साथ हरिदास सावंत याने केली. निवेदन वैभव भणगे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85527 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top