अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी दोन जागा हव्यात ‘भीम संग्राम’ची निवडणूक आयोगाकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसूचित जातीसाठी
प्रत्येकी दोन जागा हव्यात
‘भीम संग्राम’ची निवडणूक आयोगाकडे मागणी
अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी दोन जागा हव्यात ‘भीम संग्राम’ची निवडणूक आयोगाकडे मागणी

अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी दोन जागा हव्यात ‘भीम संग्राम’ची निवडणूक आयोगाकडे मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः पिंपरी विधानसभा मतदार संघात अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी राखीव असणाऱ्या प्रभागात दोन जागा या अनुसूचित जातीसाठी सोडण्याची मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेने केली आहे. याबाबत संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी एकूण बावीस जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. परंतु ज्या प्रभागात अनुसूचित जातीसाठी जागा सोडण्यात आल्या आहेत. त्या प्रभागात दोन खुल्या वर्गातील उमेदवार आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीन जागेपैकी दोन जागा ह्या खुल्या वर्गासाठी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीवर अन्याय होत आहे. तीन जागापैकी एक जागा ‘अ’ जातीसाठी सोडण्यात आली आहे. अ जातीचा उमेदवार निवडून आला तरी त्याच्यावर खुल्या वर्गातील दोन उमेदवार दबाव टाकून त्याला मागासवर्गीय भागात काम करू देणार नाहीत. त्यामुळे अनुसूचित जातीकरिता निदान पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये असणाऱ्या प्रभागात तरी सोडण्यात याव्यात. तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २९ अनुसूचित जातीची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यामुळे या प्रभागाचा विकास होणार नाही. खरोखरच विकास करायचा असेल तर या प्रभागात दोन खुल्या जागा ह्या अनुसूचित जातीकरिता सोडण्यात याव्यात व हाच निकष अनुसूचित जातीकरिता सोडण्यात आलेल्या प्रभागात दोन्ही जागा या अनुसूचित जाती करिता सोडण्यात याव्यात तरच खऱ्या अर्थाने अनुसूचित जातीला आरक्षणाचा लाभ मिळेल. अन्यथा तीन जागेपैकी फक्त एकच जागा जर अनुसूचित जातीला सोडली तर खुल्या वर्गातील दोन प्रतिनिधी हे मागासवर्गीय समाजातील प्रतिनिधीला मनासारखे प्रभागात काम करू देणार नाहीत व स्वतःही करणार नाहीत, असा आमचा आतापर्यंतचा अनुभव असल्यामुळे निदान पिंपरी विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव असल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघात असणाऱ्या प्रभागात तीन जागेपैकी दोन जागा ह्या अनुसूचित जातीला सोडण्यात याव्यात, अशी मागणी वडमारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85542 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top