
साठे विचार प्रबोधन पर्वाला निगडीत उत्साहात प्रारंभ
पिंपरी, ता. २ ः सनईचे मंगल सूर, अण्णा भाऊ साठे यांचा जयघोष, हलगीवादनाची जुगलबंदी अशा विविध कार्यक्रमांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाला प्रारंभ झाला.
महापालिकेतर्फे निगडीतील भक्तीशक्ती चौकात विचार प्रबोधन पर्वांतर्घत पाच ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याहस्ते झाले. गायक चंदन कांबळे यांनी स्वरचंदन हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रमाचा सादर केला. त्यानंतर शाहीर बापूराव पवार यांच्या ‘लेखणीचा बादशहा’ या शाहिरीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध बँड पथकांमध्ये ‘बँड स्पर्धा’ रंगल्या. प्रत्येक बँड पथकाने आपली कला सादर केली. अनिकेत जवळेकर यांचा ‘सुवर्ण लहरी’ सांस्कृतिक व योगेश देशमुख यांचा ‘महाराष्ट्राचे लोकरत्न’ प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. अरुण गायकवाड यांच्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाने रंगत आणली.
बुधवारचे कार्यक्रम
सकाळी १० ः समाज विकास विभागाकडील विविध योजनांवर आधारित आणि संजय गांधी निराधार योजनासंबंधी मार्गदर्शन शिबिर. १०.३० वाजता ः शारदा मुंढे यांचा एकपात्री प्रयोग. रांगोळी व नृत्य स्पर्धा. ११ वाजता ः दांडपट्टा, तलवारबाजी इत्यादी खेळांची प्रात्याक्षिके. दुपारी १२ ः खेळ पैठणीचा. २ वाजता ः उद्योगपती कमल परदेशी यांची मुलाखत. ३ वाजता ः ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मातंग समाज’ विषयावर चर्चा. ४ वाजता ः शाहिरी डफ कडाडला हा संगीतमय कार्यक्रम. सायंकाळी ५ ः जागर रयतेचा. ६ वाजता ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम. ७ वाजता ः समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम. रात्री ८ वाजता ः गायक मिलिंद शिंदे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85920 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..