अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वंचितची दुचाकी फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 
वंचितची दुचाकी फेरी
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वंचितची दुचाकी फेरी

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वंचितची दुचाकी फेरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
फेरीची सुरुवात संगमवाडी, पुणे येथील लहुजी (वस्ताद) साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकापासून हाती मशाल घेऊन झाली. मुंबई-पुणे महामार्गाने या फेरीचा समारोप भक्ती-शक्ती चौक निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक आघाडी शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे, पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा भालेसईन, शहर उपाध्यक्ष कचरू ओव्हाळ, धनंजय कांबळे, सुनील गायकवाड, प्रवक्ते के. डी. वाघमारे, युवा आघाडीचे सुनील जावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85986 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top