लोणावळा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करावे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा रेल्वे स्टेशनचे
आधुनिकीकरण करावे 
खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी
लोणावळा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करावे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

लोणावळा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करावे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा आणि चिंचवड रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करावे. ‘मॉडर्न वर्ल्ड क्लास स्टेशन’ बनवावेत, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.
याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. लोणावळा-पुणे रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे विद्यार्थी, कामगारांचे होत असलेली गैरसोय त्यांनी सांगितली. त्यावर याबाबत तत्काळ निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘कोरोनापूर्वी लोणावळा-पुणे या मार्गावर दिवसभर लोकल ट्रेन धावत होत्या. कोरोना काळात रेल्वेसेवा बंद केली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने सर्व रेल्वेगाड्या पूर्णपणे सुरु आहेत. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा-पुणे दरम्यानच्या मार्गावर सर्व लोकल रेल्वे गाड्या धावत नाहीत.’’
मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेले लोणावळा शहर देशातील मोठे पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी देश, विदेशातून लाखो पर्यटक लोणावळ्यात येतात. लोणावळा परिसरात सुंदर ठिकाणे, आकर्षणाचे केंद्र आहेत. त्याचबरोबर चिंचवड स्टेशनही प्रसिद्ध रेल्वे स्थानक आहे. क्रांतिकारक चापेकर बंधू आणि श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी यांची जन्म आणि कर्मभूमी चिंचवड आहे. येथेही पर्यटक येतात. चिंचवड स्टेशनवर सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे या दोन्ही स्टेशनचे आधुनिकीकरण करावे, अशी मागणीही बारणे यांनी केली.

विद्यार्थी, कामगारांसाठी १० ते ४ या वेळेतही रेल्वे गाड्या सुरु कराव्यात. लोणावळा-पुणे या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत लोकल रेल्वे धावत नाही. त्यामुळे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना चारपर्यंत रेल्वेची वाट बघत थांबावे लागत आहे. त्यात त्यांचा वेळ जातो, अभ्यासही बुडतो. त्यासाठी १० ते ४ या वेळेतही लोकल रेल्वे गाड्या सुरु कराव्यात. कामगारांसह विद्यार्थ्यांची सोय होईल, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
फोटोः 82112

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86336 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top