डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांची पाठच अनेकदा मुदतवाढ देऊनही मिळतोय कमी प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांची पाठच
अनेकदा मुदतवाढ देऊनही मिळतोय कमी प्रतिसाद
डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांची पाठच अनेकदा मुदतवाढ देऊनही मिळतोय कमी प्रतिसाद

डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांची पाठच अनेकदा मुदतवाढ देऊनही मिळतोय कमी प्रतिसाद

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः एक-दोन वेळा नव्हे, तर सलग पाचव्यांदा पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही यंदा पूर्ण क्षमतेएवढे अर्ज प्राप्त होऊ शकल नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन, तसेच सीबीएसईच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेशासाठीा पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ९ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना अकरावीबरोबरच तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध असून, तीन वर्षांच्या पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. पॉलिटेक्निकसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरवातीला ३० जूनपर्यंत अर्जासाठी मुदत दिली होती. त्यानंतर सलग पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार ९ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
आतापर्यंत शहरात २३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन डीटीइच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑगस्टमध्ये प्रवेशप्रक्रिया
बहुतांश ठिकाणी काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा प्रवेश अर्जासाठी पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ मिळेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86661 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top