भगर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिऱ्याच्या दरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगर, साबुदाणा, शेंगदाणे,
राजगिऱ्याच्या दरात वाढ
भगर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिऱ्याच्या दरात वाढ

भगर, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिऱ्याच्या दरात वाढ

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः इंधन, खाद्यतेल, भाजीपाला यापाठोपाठ ऐन श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ महागले आहेत. फराळासाठी आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच, सुटे जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्य वगळून पॅकिंग वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारल्यानेही दरवाढ झाल्याचे किराणा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
श्रावण महिन्यापासून सण-वार सुरू होतात. घरोघरी उपवास केले जातात. त्यासाठी भगर, शेंगदाणे, राजगिरा, तूप, साखर, साबुदाणा यांना मागणी असते. या पार्श्‍वभूमीवर बाजारात फेरफटका मारला असता, यंदा उपवासाच्या वस्तू महागल्याचे चित्र आहे. नियमित फराळासाठी गूळ, तूप, साबुदाणा, भगर गरजेच्या आहे. त्या गतवर्षीच्या तुलनेत महागल्या आहेत, असे व्यापारी नरेश झमतानी यांनी सांगितले.

इंधनाचे दर; काळजीचे कारण
एका बाजूला पेट्रोलचे दर शंभरीपार गेलेले आहेत. तूप, बटाटे, रताळे, फळे व पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. एका बाजूला कोरोनामुळे कमी झालेले उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसवणे सामान्यांसाठी तारेवरची कसरत ठरते आहे. त्यातच आता गतवर्षीपेक्षा यंदा श्रावण उपवास महागला असल्याची चर्चा आहे.

असा महागला फराळासाठीचा किराणा
वस्तू / २०२१ / २०२२ (प्रतिकिलो रुपयात)
भगर / १०० / १२०
साबुदाणा / ५८ / ६८
शेंगदाणा / १२० / १२५
राजगिरा / ९० / १२०
गूळ / ५५ / ५८
साखर / ३६ / ४०
खजूर / १५० / १४०
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86670 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top