एमएचटी सीईटी मॉक टेस्टसाठी मोबाईल ॲप्लिकेशन लाँच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमएचटी सीईटी मॉक टेस्टसाठी
मोबाईल ॲप्लिकेशन लाँच
एमएचटी सीईटी मॉक टेस्टसाठी मोबाईल ॲप्लिकेशन लाँच

एमएचटी सीईटी मॉक टेस्टसाठी मोबाईल ॲप्लिकेशन लाँच

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी टेस्ट (प्रवेश परीक्षा) द्यावी लागते. राज्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांना पुण्यात प्रवेश घेण्याची इच्छा असते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा सोपी जावी आणि परीक्षेचा सराव करता यावा, या उद्देशाने पीसीईटी नूतन संस्थेने ‘पीसीईटी नूतन एमएचटी सीईटी मॉक टेस्ट’ ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन विद्याप्रसारक मंडळाने एमएचटी सीईटी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत (मॉक टेस्ट) सराव परीक्षा ‘मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांच्या तीस मॉक टेस्ट उपलब्ध आहेत. टेस्ट झाल्यानंतर मेल अथवा फोनवर तातडीने विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाठवला जाणार आहे. संबंधित विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मॉक टेस्ट तयार केली आहे. या ॲप्लिकेशनमुळे विद्यार्थ्यांची ‘एमएचटी सीईटी’साठी उत्तम तयारी करण्यास साहाय्य होणार आहे. योग्य इंजिनिअरिंग महाविद्यालय निवडण्यासंदर्भात सल्ला केंद्र देखील यामध्ये समाविष्ट केले आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अप्लिकेशनचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86696 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top