देहूरोड ते चांदणी चौक ः रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार वाकड, रावेतची कोंडी सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोड ते चांदणी चौक ः रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार 
वाकड, रावेतची कोंडी सुटणार
देहूरोड ते चांदणी चौक ः रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार वाकड, रावेतची कोंडी सुटणार

देहूरोड ते चांदणी चौक ः रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार वाकड, रावेतची कोंडी सुटणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्याबाबतच्या कामाची निविदाही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लवकरच काम सुरु होईल. त्यामुळे वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळ्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मावळ लोकसभा मतदारसंघातून जात आहे. मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारित डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) करण्यासाठी खासदार बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचा डीपीआर तयार असून, लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले, अशी माहिती बारणे यांनी दिली.
खासदार बारणे म्हणाले की, देहूरोड ते चांदणी चौक हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे. देहूरोड आणि वाकडपर्यंतचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहे. वाकड ते चांदणी चौकापर्यंतचे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान १२ अंडरपास आणि उड्डाणपूल आहेत.

कामाला वेग देणार ः बारणे
देहूरोड-चांदणी चौक रस्त्याच्या कामात मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व उड्डाण पुलाची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्ताचा सुधारित डीपीआर बनविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याला यश आले असून, सुधारित डीपीआर तयार झाला आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे निविदा प्रसिद्ध करून काम वेगात पूर्ण करण्यावर माझा भर असणार आहे. काम पूर्ण झाल्यास वाकड, ताथवडे येथील वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्‍वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर
रस्त्याचे काम लवकरच
खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय राजमार्ग ५४८ -डी म्हणून घोषित केला होता. एनएचआयएने मार्गाचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, जमीन अधिग्रहीत झाली नाही. त्यामुळे ३ जुलै २०२० मध्ये या कामाला वाइरल पेंडिंग प्रोजेक्टमध्ये सहभागी केले. त्यामुळे त्याचे काम बंद झाले आहे. या महामार्गाच्या कामाचीही लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल. महामार्गाचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले.
फोटो ः 82548

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86984 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..