देहूत नागरिक सर्दी, तापाने बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूत नागरिक सर्दी, तापाने बेजार
देहूत नागरिक सर्दी, तापाने बेजार

देहूत नागरिक सर्दी, तापाने बेजार

sakal_logo
By

देहू, ता. ६ ः देहू नगरपंचायत हद्दीत नागरिक सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले असून गेल्या पाच दिवसांत १ हजार ४०० रुग्णांची नोंद झाली आहे. देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी रुग्णसंख्येची माहिती दिली.

देहू नगरपंचायत हद्दीत देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी, वडाचामाळ या भागांचा समावेश होतो. या परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून गेल्या महिन्यात विठ्ठलवाडी गावात मोठ्या संख्येने डेंगीचे रुग्ण आढळले होते. मात्र, सध्या थंडी, ताप, खोकला याचे रुग्ण वाढले असून खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची रात्री अकरा वाजेपर्यंत गर्दी होताना दिसत आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी याबाबत सांगितले की, १ ते ५ जुलै या केवळ ५ दिवसांच्या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात १ हजार ४०० रुग्णांनी सर्दी, खोकला, ताप या आजारांवर उपचार घेतले. तर एकट्या ४ जुलैला २८९ रुग्णांनी उपचार घेतले. शुक्रवारी (ता. ५) २४५ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले आहेत. देहूजवळील सांगुर्डी, येलवाडी या गावातील रुग्णही सर्दी, तापाच्या उपचारासाठी येत असल्याचे दिसते आहे. नागरिकांनी या दिवसांत उघड्यावरील पदार्थ, आंबट पदार्थ खाऊ नयेत, पावसात भिजू नये याची खबरदारी घ्यावी असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी उपचारासाठी रजेवर
देहूत थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यातच नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव गेले आठवडाभर सुट्टीवर आहेत. डॉ. जाधव यांना डेंगी झाल्याची गावात चर्चा आहे. तसेच गावात औषध फवारणी रोजच्या रोज होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच कचराही उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87171 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..