महापालिकेतर्फे १२ ऑगस्टपासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेतर्फे १२ ऑगस्टपासून
शहरात विशेष स्वच्छता मोहीम
महापालिकेतर्फे १२ ऑगस्टपासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम

महापालिकेतर्फे १२ ऑगस्टपासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त महापालिकेने आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १२ ते १५ ऑगस्ट कालावधीत विविध ठिकाणी ‘प्लॉगेथॉन’ अर्थात विशेष स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. या उपक्रमात शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे. १२ ऑगस्ट रोजी अ आणि फ, १३ ऑगस्ट रोजी ब आणि ग, १४ ऑगस्ट रोजी ड आणि इस १५ ऑगस्ट रोजी क आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येईल. या कालावधीत पदयात्रा काढून ‘एकदाच वापरासाठी असलेल्या प्लास्टिक विरोधी जनजागृती मोहीम’ राबविण्यात येईल. प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली जाईल. कापडी पिशवी वापराबाबत फळ, भाजी विक्रेते, टपरी, हातगाड्यावरील विक्रेत्यांमध्ये जनजागृती, ‘कापडी पिशवी सोबत सेल्फी’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87218 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top