तीन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
तीन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

तीन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : ताथवडे येथील दहा गुंठे क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करून ६५ हजार रुपयांचे तारेचे कपौंड व फ्लेकस बोर्ड चोरी केल्याचा गुन्हा पिंपरीतील तीन बांधकाम व्यावसायिकांवर दाखल झाला आहे. श्रीचंद आसवानी, भरत हासोमत आसुदानी व नरेंद्र सुंदरलाल चुघ अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात हरीश मगारामची माळी (रा. भोईर प्लाझा, १९/०३, डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, माळी व तुषार पवार यांनी ताथवडे येथील १० गुंठे जमीन श्रीमती ज्योती संजय आगेलु (वय ५०, रा. उष:काल हौसिंग सोसायटी, सांगवी) यांच्याकडून २३ फेब्रुवारीला ७५ हजार रुपये देवून इसार पावती केली. त्यांनतर पौड भूमी अभिलेख कार्यालयातून मोजणी करून घेतली. आसवानी असोसिएट्सचे भागीदार नरेंद्र चुघ यांची मोजणीला हरकत घेतल्याची नोटीस २४ एप्रिलला प्राप्त झाली. त्यानंतर २८ एप्रिलला सुनावणी होऊन ३० एप्रिलला आम्हाला मोजणीची प्रत मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही तारेचे कपौंड व फ्लेकस बोर्ड लावला. माळी व त्यांचे सहकारी त्या जागेवर ७ मे रोजी गेल्यावर कपौंड व फ्लेकस बोर्ड नाहीसा होऊन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर १२ मे रोजी जागेवर ताबा घेण्यासाठी गेले असता. त्या ठिकाणी सात-आठ व्यक्ति आल्या व त्यांनी, आसवानी असोसिएट्सचे आम्ही कर्मचारी असून धमकी देत दमदाटी करत जागेवर पुन्हा येवू नका’ , असे बजावले. त्यांनतर आम्ही पोलीसांना बोलविले. तरीही आसवानी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्या जागेवर अतिक्रमण करून फ्लेकस बोर्ड लावला व निगराणीसाठी वॉचमन ठेवला.

दरम्यान, पवार यांनी खरेदीसाठी असमर्थता दर्शविल्यानंतर मी किरण प्रकाश बुचडे यांच्या समवेत आगेलु यांच्याकडून ही जागा खरेदी केली. त्यानुसार आमच्या नावावर सात-बारा व फेरफार झाला आहे. आम्ही जागेवर गेलो असता आसवानी असोसिएट्स यांनी ताबा घेवू दिला नाही. त्यामुळे वाकड पोलिसांकडे आम्ही फिर्याद दिली, असे माळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आसवानी यांची करामत...
दरम्यान, श्रीचंद आसवानी यांचे पोलिसांमध्ये चांगले संबंध असल्याने त्यांनी पोलिसांच्या प्रेस नोटमधून जाणीवपूर्वक आपले नाव वगळून घेतले होते. प्रेस नोटला फक्त चुघ व त्यांचे दोन सहकारी असा उल्लेख होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87248 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top