चिंचवडमध्ये उद्योजिकांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये उद्योजिकांना मार्गदर्शन
चिंचवडमध्ये उद्योजिकांना मार्गदर्शन

चिंचवडमध्ये उद्योजिकांना मार्गदर्शन

sakal_logo
By

आकुर्डी, ता. ७ : नाबार्ड व पीडीसीसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भोईरनगर, चिंचवड येथे आयोजित महिला बचत गट मार्गदर्शन कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा झाली.
कृषी सहायक रुपाली भोसले म्हणाले, ‘‘मानव व पशु यांना आवश्यक खाद्यपदार्थांवरील सर्व प्रक्रिया उद्योग या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दूध व दुग्धजन्य पदार्थ, हरभरा, हळद, मिरची, गूळ, द्राक्षे, नाचणी, बेकरी, वन उत्पादने ,पल्प, सागरी उत्पादने अशा अनेक प्रक्रिया उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. शेतमालावरील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजना कालावधी २०२० ते २०२५ आहे. वैयक्तिक भागीदारी, खासगी उद्योग, एफपीसी, एफपीओ, बचत गट, स्वयंसहायता गट, एनजीओ, सहकारी संस्था योजनेत सहभागी होऊ शकतात. खर्चाच्या ३५% तर जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान देय आहे. अन्नप्रक्रिया उद्योग करणाऱ्या बचत गटांना प्रति लाभार्थी ४० हजाराप्रमाणे चार लाख अनुदान देय आहे.’’
महिला बचत गट कार्यशाळेत अनुराधा दबडे, प्रकल्प अधिकारी यांनी सखोल मार्गदर्शन केले. हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मोशी मंडळ कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा कविता खराडे यांनी समन्वयन केले. प्रविण शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक विकास दांगट पाटील, वरिष्ठ अधिकारी तृप्ती कांबळे, शाखा व्यवस्थापक सुजाता हिंगे, विभागीय अधिकारी शिवदास गायकवाड, बचत गट महासंघ अध्यक्षा किरण भोईर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87372 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..