चिलटांच्या त्रासाने नागरिक हैराण आरोग्याचा प्रश्‍न : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिलटांच्या त्रासाने नागरिक हैराण 

आरोग्याचा प्रश्‍न : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
चिलटांच्या त्रासाने नागरिक हैराण आरोग्याचा प्रश्‍न : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चिलटांच्या त्रासाने नागरिक हैराण आरोग्याचा प्रश्‍न : तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : एकीकडे डेंगी, मलेरियाने डोके वर काढले आहे. सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात चिलटांची आणखी भर पडली आहे. पावसाच्या पाण्याने नाले साफ होत आहेत तर, दुसरीकडे जलपर्णी देखील वाहून जात असल्याने चिलटांचा प्रादूर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. परिणामी, या चिलटांच्या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी तीव्रतेने भेडसावू लागल्याचे समोर आले आहे.

भोसरी, दिघी, चिंचवड, आकुर्डी, रहाटणी, कासारवाडी, पिंपळे गुरवसह आदी भागातील नागरिक चिलटांच्या त्रासाला वैतागले आहेत. स्वयंपाक घरात तसेच कचऱ्याच्या भोवती चिलटांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे, नागरिकही वारंवार धुरांचे प्रयोग घरात करीत आहेत. तर, काही जण चिलटे हटविण्यासाठी पाण्याच्या पिशव्या तसेच तेलाचे कागद ठिकठिकाणी लटकवीत आहेत. मात्र, या तात्पुरत्या इलाजाने चिलटांना कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही. चिलटे कमी होण्याऐवजी घरभर त्यांचा वावर वाढला आहे. गृहिणी स्वयंपाक करतानाही या चिलटांच्या त्रासामुळे वैतागल्या आहेत. त्यात कहर म्हणजे, लहान मुले व घरातील ज्येष्ठ मंडळी चिलटांच्या त्रासाने हैराण झाले आहेत.
--
जर काही खाण्याचा पदार्थ उघडा राहिला किंवा त्याच्यावर, स्वच्छ घासलेल्या भांड्यांवर, कपड्यांवरसुद्धा चिलटांचा थवा बसलेला दिसून येत आहे. औषध मारून, धूप जाळून चिलटांना हटविण्याचा प्रयत्न करत आहे. केळ्याचे काप करून काही जण ठेवायला सांगत आहेत. तर काही, जण घरात ओलावा करू नका. असे निरनिराळे फंडे सांगत आहेत.परंतु, चिलटांसाठी फवारणी तसेच वेळेत उपाययोजना महापालिकेने कराव्यात.
- पूजा गोडसे, भोसरी, गृहिणी
---
चिलटांच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यावर त्वरित उपाययोजना करून डबकी असलेल्या ठिकाणी फवारणी करण्याचे काम सुरु आहे. साचलेल्या पाण्यामुळे आजार उद्भवणार नाहीत, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.
- अजय चारठाणकार, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87401 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..