महापालिकेच्या इमारतीत अस्वच्छेतेची ‘शाळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या इमारतीत अस्वच्छेतेची ‘शाळा’
महापालिकेच्या इमारतीत अस्वच्छेतेची ‘शाळा’

महापालिकेच्या इमारतीत अस्वच्छेतेची ‘शाळा’

sakal_logo
By

मालिका भाग १
-

पिंपरी, ता. ७ ः महापालिकेच्या निगडी- प्राधिकरणातील सिंधूनगर येथील इमारतीमध्ये खासगी शैक्षणिक संस्थाच्या तीन शाळा भरतात. ऐन पावसाळ्यात इमारतीसह परिसराची दुरवस्था झाली आहे. मैदानावर चिखल, कचरा व अस्वच्छता पसरली आहे. सांडपाणी वाहिनी तुंबलेली असल्याने डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे, अशी विदारक स्थिती किर्ती, सरस्वती आणि फिजीओथेरपी या तीन शाळांची आहे. महापालिकेच्या इमारतींमध्ये या शाळा भाडेतत्वावर भरत असल्याने स्वच्छता नेमकी करायची कोणी? असा पेच कायम उद्भवत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आमचे आरोग्य कधी चांगले राहणार? असे म्हणण्याची वेळ इथल्या विद्यार्थ्यांवर आली आहे.
महापालिकेच्या इमारतीमध्ये सकाळ आणि दुपार या दोन सत्रात तीन हजार विद्यार्थी शिकतात. मात्र, त्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. वर्षभरानंतरही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता याबाबतच्या समस्या कायम आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने शाळेची सुरक्षा धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अस्वच्छ ठिकाणी पाण्याची टाकी आहे. मुले तशाच स्थितीत पाणी पित असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या तुटलेल्या आहेत. ३५ वर्ष जुनी इमारत असल्याने जीर्ण अवस्थेत आहे. सांडपाण्याची वाहिनी फुटली आहे. चेंबर तुंबलेले असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मुली नाकाला रूमाल लावून वावरताना दिसतात. शाळेच्या पटांगणात पाणी साचते. चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत तसेच वर्गात जाण्यासदेखील मोठी कसरत करावी लागते. पाण्याच्या डबक्यातून विद्यार्थी कशीतरी वाट काढत शाळेत जातात. या संदर्भात सहा महिन्यात संबंधित आरोग्य विभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. उघडी गटारे हिरव्या कपड्याने आच्‍छादली आहेत. पण दुर्गंधीचे काय? असा प्रश्‍न विद्यार्थी करताहेत. परिसरात गवत वाढलेले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(पूर्वार्ध)

मुख्याध्यापकांची खोलीला गळती
मुख्याध्यापकांच्या खोलीला एक वर्षापासून गळती लागलेली आहे. पावसाच्या पाण्याने सगळी भिंत भिजलेली आहे. ओल लागल्याने भिंतीला शेवाळ जमा झाले आहे. भिंतीचे पापुद्रे निघाले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे कार्यालयीन कागदपत्रे भिजच आहेत. सगळे साहित्य अस्ताव्यस्त झाले आहे.

मागील सहा महिन्यापासून ड्रेनेज वाहिनी तुंबलेली आहे. सगळी दुरवस्था आहे. भाडेतत्त्वावर शाळा असल्याने महापालिकेकडून आरोग्य सुविधा पुरविण्यास दुर्लक्ष केले जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तात्पुरती फवारणी केली जाते. आमच्याकडून वारंवार पत्रव्यवहार केला जातो. पण टाळाटाळ केली जात आहे.
- अशोक जाधव, मुख्याध्यापक, किर्ती विद्यालय, प्राधिकरण

महापालिकेने शाळेला भाडेतत्त्वाने इमारत दिली आहे. महापालिकेच्या करारानुसार शाळा स्वच्छतेची जबाबदारी शाळेची आहे. चेंबर आणि स्थापत्य विषयक कामे महापालिकेने करावेत.
- राजू साबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
---
फोटो फिचर
८२७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87524 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..