धरणांची बाह्यसुरक्षाबाबत पाटबंधारे खात्याविरोधात उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणांची बाह्यसुरक्षाबाबत पाटबंधारे खात्याविरोधात उपोषण
धरणांची बाह्यसुरक्षाबाबत पाटबंधारे खात्याविरोधात उपोषण

धरणांची बाह्यसुरक्षाबाबत पाटबंधारे खात्याविरोधात उपोषण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : राज्यातील व संपूर्ण देशातील धरणांची बाह्यसुरक्षा व देखभालीसंबंधी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. गेल्या १० वर्षांपासून हजारो किमी प्रवास, सुमारे १२ हजार पत्रव्यवहार, साडेतीन हजार याचिका दाखल केल्या. धरणांची वास्तव, गंभीर व दुर्लक्षित परिस्थिती शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यासंबंधी सरकारला अहवाल सादर करुनही कासवगतीने कार्यवाही सुरू आहे. याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरीत सामाजिक कार्यकर्ते दीपक नामदेव बच्चे पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत उपोषण केले.
उपोषण हे सरकार, पाटबंधारे मंडळ यांनी दखल घेईपर्यंत चालू राहणार आहे. राज्यातील महत्त्वाची व मोठी धरणे जवळपास ५० टक्क्यांहून अधिक गाळानेच भरली आहेत. पाणी साठवणूक क्षमता निम्म्याने घटली आहे. ७० ते ८० टक्के धरणांवर गाळ सर्व्हेक्षण नाही. राज्यातील कोणत्याही मोठया, मध्यम धरणांवर गाळ निष्कासन कार्यवाही नाही. पाटबंधारे मंडळाला धरणांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ व आर्थिक बळ कमतरता आहे. पाटबंधारे खात्यात १४ हजार नोकऱ्यांची भरती केवळ घोषणा आहे. शासकीय नियम २०१४ ते २०१८ हे गाळ निष्कासन अपयशी ठरले आहे. उच्च अधिकारी कार्यालयातून तीन वेळा नोटीस काढूनही धरण सुरक्षा संबंधी अनुपालन अहवाल बऱ्याच विभागाने सादर केला नाही.
या विषयांवर सरकार, प्रशासन व पाटबंधारे मंडळ यांनी उच्चस्तरावरून चौकशी करून सरकारची पुढील भूमिका स्पष्ट करावी. यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करून प्रत्यक्ष भेटीतून सविस्तर माहिती घ्यावी. तोपर्यंत उपोषण ओम इंडस्ट्रीज, प्लॉट क्र. ए-२६, एच-ब्लॉक, एमआयडीसी, पिंपरी या ठिकाणी चालू राहणार आहे. दीपक बच्चे, रमेश दिवाने, सुनील लांडगे, राजाभाऊ शिवतारे व अरुण पवार यांनी उपोषण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87632 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..