पाणीसाठा वाढतोय; पण, चिंता कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीसाठा वाढतोय;
पण, चिंता कायम
पाणीसाठा वाढतोय; पण, चिंता कायम

पाणीसाठा वाढतोय; पण, चिंता कायम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः जुलैच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सलग पाच दिवस पावसाने दडी मारल्याने उन्हाचा तडाखा वाढला होता. परिणामी बाष्पीभवन होऊन पवना धरणातील पाणीसाठा घटू लागला होता. मात्र, चार ऑगस्टपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे नऊ टक्क्यांनी धरणातील पाणीसाठा कमी असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. ते दूर होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मावळ तालुक्यातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा केला जातो. सर्वसाधारणपणे ३१ जुलै रोजी धरण शंभर टक्के भरल्यास पुढील वर्षी ३१ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरतो असे गणित आहे. मात्र, यावर्षी कमी पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा केवळ ८१.२३ टक्के होता. गेल्या वर्षी याच तारखेला पाणीसाठा ८६.०४ टक्के होता. असे असले तरी ऑगस्ट महिन्यात अधिक पाऊस पडतो, या अनुभवातून पाण्याचे नियोजन केले जाते. गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे पाण्याची सरासरी साधता आली होती. या वर्षी अद्याप सुमारे १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा नेहमीप्रमाणे प्रतिदिन ५१० दशलक्ष लिटर इतकाच आहे. अर्थात पाण्याचा वापर कमी झालेला नसून धरणातील पाणीसाठा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. या सर्वांचा विचार करून पुढील वर्षभराचे पाणी नियोजन करणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षीपेक्षा नऊ टक्के कमी
गेल्या वर्षी ९ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा ९४.१७ टक्के होता. गेले आठ-दहा दिवस पावसाने दडी मारल्या यावर्षीचा पाणीसाठा केवळ ८१.१३ टक्क्यांवरच अडकला होता. शनिवार व रविवारी तो ८० टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ९.३० टक्क्यांनी कमी आहे.

मंगळवारची धरण स्थिती (सायंकाळी ५ वाजता)
२४ तासांतील पाऊस ः ५७ मिलिमीटर
१ जूनपासून एकूण पाऊस ः १७४८ मिलिमीटर
धरणातील पाणीसाठा ः ८४.८७ टक्के

पवना धरणातील पाणीसाठा
तारीख / पाणीसाठा (टक्के)
१ / ८१.२३
२ / ८१.२३
३ / ८१.२३
४ / ८०.९९
५ / ८०.७४
६ / ८०.९९
७ / ८१.२३
८ / ८१.४७
९ / ८४.८७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88275 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..