क्रांतीदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतीदिन साजरा
क्रांतीदिन साजरा

क्रांतीदिन साजरा

sakal_logo
By

क्रांतिदिन ः शाळांमधून घोषणा देत केली जनजागृती

क्रांतिकारकांच्या स्मृतीला अभिवादन

पिंपरी, ता. ९ ः क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, विविध संस्था-संघटना आणि शाळांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनी क्रांतिदिन साजरा केला. ‘तिरंगा है मेरी जान, भारत देश मेरा महान,’ ‘भारत मातेचे सेवक आम्ही, तिरंग्याचे रक्षक आम्ही,’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, भारतमाता, शिवाजी महाराज, संत तुकाराम, क्रांतिकारी, सैनिक, पोलिस यांच्या वेशभूषा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. परिणामी, शहर परिसरात स्वातंत्र्याचे व देशभक्‍तीचे वातावरण निर्माण झाले होते.
काळेवाडी येथील कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत क्रांतिदिनी ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढली. शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे सचिव मल्हारी तापकीर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार, पालक व नागरिक उपस्थित होते. प्रभातफेरीचे नियोजन उपशिक्षिका उल्का जगदाळे, पुनम कांबळे, रवींद्र बामगुडे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
चिंचवडेनगर येथे शेखर बबनराव चिंचवडे यांच्याकडून ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम परिसरात साजरा केला. घराघरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अभिमानाने तिरंगा फडकावून भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी चिंचवडे यांच्याकडून राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले.

श्री फत्तेचंद कॉलेजमध्ये व्याख्यान
श्री फत्तेचंद जैन ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला. थोर क्रांतिकारक चाफेकर बंधू यांच्या स्मारकाला भेट देऊन प्राचार्या, उपप्राचार्य, विभागप्रमुख व विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली व अभिवादन केले. चाफेकर वाड्यात बोबडे यांनी चापेकरांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. महाविद्यालयामध्ये क्रांती दिनानिमित्ताने शिल्पा दिघीकर या वीर मातेच्या व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कारगिल शहीद जवानांच्या अमर बलिदानाची गाथा मांडली. युवकांना भारतीय सेना दिलात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. क्रांती दिनानिमित्त महाविद्यालयाचे सचिव राजेंद्र मुथा व शाळा समितीचे अध्यक्ष अनिलकुमार कांकरिया व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विरांच्या स्मृतींना उजाळा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून क्रांती मशाल प्रज्वलित केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता नवले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांनी करून दिला. आभार वाणिज्य विभाग प्रमुख सौ. वांजळे यांनी मानले. अशा पद्धतीने मंगलमय व क्रांती पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

‘काका’स इंटरनॅशनल’तर्फे पदयात्रा
नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘काका’स इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पदयात्रा काढली. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी गोडांबे कॉर्नर येथे पदयात्रेचे स्वागत केले. पदयात्रेत ‘भारत माता की जय, जय जवान जय किसान,, वंदे मातरम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. नागरिकांना हर घर तिरंगा असा संदेश देण्यात येत होता. कार्यक्रमाचे आयोजन स्वीकृत नगरसेवक व सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद हनुमंत तापकीर स्कूलचे ट्रस्टी ज्ञानेश्वर तापकीर, अध्यक्ष नवीन तापकीर, नीलेश तापकीर व ‘काका’स इंटरनॅशनलच्या मुख्याध्यापिका बबिता नायर यांनी केले. माजी नगरसेविका सविता खुळे, बाबासाहेब त्रिभुवन, प्रमोद ताम्हनकर, गणेश भोसले, राहून बनकर, विनय मोरे, कैलास सानप, अभिषेक वाळके उपस्थित होते. पदयात्रेत दरम्यान जागोजागी पदयात्रेचे स्वागत करून लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. स्कूलच्यावतीने वृक्षारोपण केले. या पदयात्रेस माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे मार्गदर्शन झाले. विनोद तापकीर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

‘संत साई’मध्ये प्रभातफेरी
संत साई स्कूलमध्ये क्रांतीसप्ताहाची अतिशय उत्साहात सुरवात
झाली. शाळा ते भोसरी गाव मार्गे प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल ओमप्रकाश मसरकल व शाळेचे प्राचार्य शिवलिंग ढवळेश्वर यांच्या हस्ते क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात आली. उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, प्रायमरी प्रभारी तेहमिना तहसीलदार, सहशिक्षक मृणाल लिमये, मनोज वाबळे, स्मिता ढमाले, प्रमोद शिंदे, संजय अनर्थे, काशिनाथ कत्नाळी, भारती ढवळेश्वर व इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी शिक्षक वृंद, पालक -शिक्षक संघाचे प्रतिनिधींनी फेरीत सहभाग घेतला. पाचवी, सहावी, सातवीची मुले स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारकांचा वेश धारण करून सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी भोसरी परिसर दुमदुमून गेला. या प्रभात फेरीच्या माध्यमातून वसुंधरा संवर्धनाचा संदेश दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88381 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..