‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा अहवाल सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा अहवाल सादर करा
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा अहवाल सादर करा

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा अहवाल सादर करा

sakal_logo
By

पिंपरी, ता.९ ः सरकारतर्फे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ राबवण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील महापालिका आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक, शाळांना विविध उपक्रम राबवण्याचा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत राबविणाऱ्या उपक्रमांचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मागितला आहे. परिणामी शाळा तयारीला लागल्या आहेत. सध्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची तयारी सगळीकडे सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ता. ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’ हा उपक्रम वॉर्ड पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्‍यक सूचना शाळांना दिल्या आहेत. स्‍वातंत्र्य काळापासूनच भारतीय जनमाणसामध्ये विचारांचा तसेच उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी प्रभातफेरीचे साहाय्य घेण्यात येणार आहेत. या उपक्रमांबाबत विद्यार्थी, पालक व जनता यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरींचे आयोजन करण्यासाठी शाळांना सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सांगितले आहे. प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज लावण्यासाठी शाळांनी जनजागृती करण्याची कार्यवाही करावी, त्याची छायाचित्रे व व्हीडीओ क्लिप मुख्याध्यापकांनी या कार्यालयास सादर करावी, अशी सूचना शिक्षण उपसंचालक औंदुबर उकिरडे यांनी केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88514 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..