ऊन, पाऊस आणि सावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊन, पाऊस आणि सावली
ऊन, पाऊस आणि सावली

ऊन, पाऊस आणि सावली

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः शहर परिसरात गुरुवारी कधी ऊन, कधी पाऊस तर कधी मेघाच्छादित हवामानामुळे सावली, असे वातावरण
होते. अधून-मधून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. खड्डे पडून रस्त्यांची चाळणही झाली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून शहर परिसरात कधी जोरदार तर, कधी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमीन भुसभुसीत झाली असून ठिसूळ झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा कासारवाडी ते भोसरी दरम्यान घडल्या आहेत. निवासी भागातही काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. रस्त्यांवरील बुजवलेले चर व खड्डे पुन्हा उघडे पडले असून, त्यात वाहने आदळत आहेत. त्यातील बारीक खडी रस्त्यांवर पसरून दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पवना धरण ९० टक्के
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८.५० टक्क्यांनी वाढला असून, एकूण पाणीसाठा ९०.९२ टक्के झाला. गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजीचा पाणीसाठा ९४.१७ टक्के होता. धरण क्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत एक हजार ९१९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मुळशी धरण ८९ टक्के
मुळा नदीवरील मुळशी धरणाची पाणी पातळी गुरुवारी (ता. ११) सकाळी सात वाजता ६०५.७० मीटर झाली होती. धरणातील पाणीसाठा ५०६.५२ दशलक्ष घनमीटर झाला असून ते ८८.७४ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत दावडी पर्जन्यमापक केंद्रात ३०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, गेल्या २४ तासांत ४९.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे.

मुळा नदी काठच्यांना इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढून मुळशी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून आवश्यकतेनुसार नियंत्रित विसर्ग सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मुळा नदीपात्रात कोणी उतरू नये. नदी काठचे साहित्य, जनावरे तत्काळ हलविण्यात यावेत. नागरिकांना सूचित करावे, असे आवाहन धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89086 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..