बंधन नसले तरी, नियमांचे हवे पालन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंधन नसले तरी,
नियमांचे हवे पालन
बंधन नसले तरी, नियमांचे हवे पालन

बंधन नसले तरी, नियमांचे हवे पालन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः कोरोना प्रतिबंधक नियम सरकारने शिथिल केले आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक मास्क वापरायचेच जणू विसरून गेले आहेत. ना सोशल डिस्टंसिंग, ना वारंवार हात धुणे वा सॅनिटायझर वापरणे असेच चित्र सध्या दिसत आहेत. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या, त्यांत पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण आणि गेल्या महिनाभरात तीन जणांचा झालेला मृत्यू बघता कोरोना गेला असे म्हणता येणार नाही. त्यासाठी बंधन नसले तरी नियमांचे पालन प्रत्येकाने करायलाच हवे, अशी स्थिती आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल केले आहेत. मास्क वापरणेही ऐच्छिक आहे. त्यामुळे अनेकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरू झाले आहेत. बाजारपेठा, मॉलमध्ये गर्दी होत आहे. सध्या ऊन, पाऊस अशी स्थिती असल्यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, तापाचे रुग्ण वाढले आहेत. महापालिकेसह खासगी दवाखाने व रुग्णालयांमधीही रुग्णसंख्या अधिक दिसत आहे. महापालिकेच्या तपासणी केंद्रांवर कोरोनाची टेस्ट करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी, त्यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. गेल्या तीन दिवसांतील टक्केवारी पाहता सरासरी १२ टक्के पॉझिटिव्हीटी आहे. नऊ ते ११ ऑगस्ट या कालावधीत दोन हजार १८८ जणांनी तपासणी केली. त्यातील २६१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असून गृहविलगीकरणात अधिक रुग्ण आहेत.

गुरुवारची स्थिती
प्रकार / रुग्णसंख्या
रुग्णालयात / २६
गृहविलगीकरणात / ६०४
एकूण सक्रिय / ६३०

गेल्या महिनाभरातील मृत्यू
तारीख / वय
७ जुलै / ४२
४ ऑगस्ट / ३९
१० ऑगस्ट / ७४

गेल्या तीन दिवसांतील स्थिती
तारीख / तपासले / पॉझिटिव्ह / डिस्चार्ज
९ / ७७३ / ११२ / १४३
१० / ७०५ / ६१ / ११३
११ / ७१० / ८८ / ८६

माझी मुलगी पाच वर्षांची आहे. तिला सोमवारपासून ताप येतो आहे. कोरडा खोकला आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पण, तीन दिवस ताप कमी-जास्त व्हायचा. तो १०२ पर्यंत जायचा. काल सायंकाळपासून तिला ताप नाही.
- गृहिणी, पिंपरी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना अन्य व्याधीही होत्या. महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली आहे. आठ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोसही दिला जात आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89100 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..