घटस्थापनेला आंद्राचे पाणी दारात शहरातील पाणीपुरवठा ः २४ आॅगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घटस्थापनेला आंद्राचे पाणी दारात 
शहरातील पाणीपुरवठा ः २४ आॅगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
घटस्थापनेला आंद्राचे पाणी दारात शहरातील पाणीपुरवठा ः २४ आॅगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

घटस्थापनेला आंद्राचे पाणी दारात शहरातील पाणीपुरवठा ः २४ आॅगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २४ ऑगस्टपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल. वीज जोडणी करून प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्रांतील पाण्याचे ‘टेस्टिंग’ करण्यात येईल. त्यानंतर सप्टेंबरअखेर अर्थात घटस्थापनेच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांच्या दारात आंद्राचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा सुरळीत आणि सक्षम करण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पाचे धरण प्रकल्पाचे काम मार्गी लावले होते. काही दिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करण्यात आली होती. तसेच, प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भामा आसखेड प्रकल्पांतर्गत निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी नदीजवळ उपसा केंद्र या ठिकाणी पंपिंग मशिनरी उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी २२ केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजजोडणी करण्याचे काम २४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नदीजवळ उपसा करून पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल.
तसेच, चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पाण्याचे टेस्टिंग सुरू होईल. सर्व तपासणी केल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शुद्ध पाणी पुरवठा शहराला होईल, असा दावा भाजपने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89583 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..