‘हर घर’ तिरंगा देऊन इच्छूकांकडून प्रचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हर घर’ तिरंगा देऊन इच्छूकांकडून प्रचार
‘हर घर’ तिरंगा देऊन इच्छूकांकडून प्रचार

‘हर घर’ तिरंगा देऊन इच्छूकांकडून प्रचार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः महापालिका निवडणुकीचे वारे घोंघावत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे अशा इच्छुकांनी तिरंग्याच्या आडून छुपा प्रचार सुरू केला आहे. त्यात भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत. ‘हर घर’ तिरंगा देऊन इच्‍छुक उमेदवार पुन्हा चार्ज झाल्याचे दिसून येत आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जोरदार तयारी दिसत आहे. याच निमित्ताने अनेकांनी प्रचार सुरु केला आहे. अभियानाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच स्वतःच्या नावाच्या प्रचाराची आयती संधी इच्छुकांनी ‘कॅश’ केली आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रभागातच प्रचार करावा. प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकापर्यंत उमेदवाराचे नाव, परिचय आणि चिन्ह पोहोचले पाहिजे. एक-एका प्रभागात २० ते २२ इच्छुक आहेत. तर एका एका प्रभागात दोन ते तीन पॅनेल आहेत. प्रचारासाठी अनेक माजी लोकप्रतिनिधींनी ध्वजाचे हजारोच्या संख्येने गठ्ठे विकत घेतले आहेत.

यानिमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्याकडून आपापल्या वॉर्डातील किंवा प्रभागातील लोकांच्या घरोघरी तिरंगा वाटप करण्यात येत आहे. त्या पाकिटावर इच्छुक उमेदवाराचा फोटो लावण्यात आलेला असून यात कापडी ध्वज दिला जात आहे. यानिमित्ताने इच्छुकांच्या नावानिशी घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येत आहे. यानिमित्ताने घराघरांत जाऊन पक्षाचा प्रचार सुरू झाला आहे. काही इच्छुकांनी बेरोजगार मुलांना वितरणाचे काम दिले आहे. ती मुले सायंकाळी वसाहती, सोसायट्यांमध्ये वाटप करताना दिसून येत आहे. याबरोबरच महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयातील तिरंगा विक्री केंद्र आणि टपाल कार्यालयावर ध्वज खरेदीसाठी राजकीय कार्यकर्त्यांसह पुढाऱ्यांचीदेखील वर्दळ दिसून येत आहे. याचा परिणाम बाजारात दिसत असून तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
--
पॉईंटर
- पाकिटावर इच्छुक उमेदवाराचा फोटो
- यानिमित्ताने घराघरांत पक्षाचा प्रचार
- बेरोजगार मुलांना वितरणाचे काम
- हजारोच्या संख्येने गठ्ठे खरेदी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89821 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..